शेअरचॅटचा ‘टकाटक’ टेकओव्हर; MX TakaTak खिश्यात, 600 मिलियन डॉलरला खरेदी

Foods For Long Life: सध्याच्या दिवसांमध्ये अनेकांना शारीरिक समस्या व वेगवेगळ्या आजारांमुळे प्रत्येकाचे आयुष्यमान कमी झालेले आहे परंतु नुकत्याच केले गेलेल्या रिसर्चमध्ये असे सांगितले गेले आहे, की रेड आणि प्रोसेस्ड केलेले मांस ऐवजी काही पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये आवर्जून करायला हवा. असे कोणते पदार्थ आहेत की ज्यांचा समावेश केल्याने तुमचे आयुष्य वाढू शकते , चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल...

शेअरचॅटचा ‘टकाटक’ टेकओव्हर; MX TakaTak खिश्यात, 600 मिलियन डॉलरला खरेदी
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 8:38 PM

मुंबईः Foods For Long Life: निरोगी आणि शरीर फिट ( healthy body) राहण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण दिवसभरातील काम सोपी व्हावे याकरिता वेगवेगळ्या दैनंदिन क्रिया करत असतात जसे की सकाळी उठल्यावर गरम,कोमट पाणी पिण्यापासून ते रात्री जेवण केल्यानंतर फिरायला जाणे परंतू तज्ञ मंडळींच्या मते या सगळ्या गोष्टी तर आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे परंतु त्यापेक्षा सर्वात जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे आपले आहार(Diet) . आपण कशा पद्धतीचा डायट दैनंदिन जीवनामध्ये स्वीकार करत असतो, या सर्वांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होताना पाहायला मिळतो.एखादी व्यक्ती हेल्दी डाएट खात असेल तर त्याचे आरोग्य नेहमी चांगले राहते त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने आहार केल्याने आपल्या शरीरामध्ये अतिलठ्ठपणा सुद्धा निर्माण होतो आणि त्याचबरोबर शरीरामध्ये अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते. जर आपल्याला कोणताही आजार उद्भवला तर त्यामुळे सुद्धा आपले आयुष्य (long life )हळूहळू कमी होऊ लागते.

नुकतेच केले गेलेल्या एका अभ्यास अंतर्गत असे सिद्ध झाले आहे की, जे लोक आपल्या आहारामध्ये रेड मांसाहार आणि प्रक्रिया केलेले मांसाहार ऐवजी आपल्या आहारामध्ये डाळ, हिरव्या पालेभाज्या, शेंगा इत्यादींचा समावेश करतात तर त्यांचे वयोमान वाढण्याची शक्यता असते तसेच या व्यक्ती 13 वर्षापेक्षा अधिक काळ जिवंत राहू शकतात.असे सुद्धा सांगण्यात आले आहे की, जर एखादी ज्येष्ठव्यक्ती वरील सर्व पदार्थांचा आहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये समावेश करत असेल तर ती व्यक्ती 3 ते 8 वर्ष अधिक जिवंत राहू शकते.

नेमके काय सांगते केले गेलेले संशोधन

PLOS मेडिसिन जर्नल मध्ये पब्लिश झालेल्या रिसर्च नुसार आहारामध्ये रेड आणि प्रोसेस्ड केलेले मीट ऐवजी वेगवेगळे धान्य , कडधान्य तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगांचा समावेश केल्याने आपले वयोमान वाढण्यास मदत होते. नॉर्वे मध्ये करण्यात आलेल्या रिसर्च नुसार ,बाहेरगावी राहणारे लोक आपल्या आहारात ड्राय फ्रूट,हिरव्या पालेभाज्या, कड धान्य यांचा अजिबात समावेश करत नाही उलट यासारखी सर्व पदार्थ आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे पण विदेशात राहणारे लोक आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दुधापासून बनवलेले पदार्थ , मैद्याचे पदार्थ , मांसाहार इत्यादी पदार्थांचा समावेश करतात यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अति लठ्ठपणा, अतिरिक्त वजन, डायबिटीस, कॅन्सर यासारख्या समस्या उद्भवतात. या सगळ्या समस्यांमुळे आपले आयुष्य हळू हळू कमी होऊ लागते.

रिसर्च केल्यानंतर एक्सपर्ट मंडळींनी सांगितले की, विदेशात राहणाऱ्या लोकांनी जर योग्य पद्धतीचा आहार नियमितपणे फॉलो केला तर त्यांचे आयुष्य वाढू शकते तसेच यांनी आपल्या आहारामध्ये फ्रेश ताजे अन्नपदार्थ ,फळ आणि ड्रायफूट यांचा समावेश अवश्‍य करायला हवा असे केल्याने त्यांचे आयुष्य वाढू शकते.

बर्गन यूनिवर्सिटी (University of Bergen) मधील लोकांना रिसर्च दरम्यान एक गोष्ट कळाली की जर वय वर्ष 60 असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये या सर्व पोषक तत्वांनी उपयुक्त असलेल्या पदार्थांचा समावेश केला तर त्यांचे जीवनमान 8.5 वर्षे वाढू शकते तसेच जर वय वर्ष 80 असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आहारामध्ये पोषक तत्त्वांनी उपयुक्त असलेले पदार्थांचा समावेश जर केला तर त्यांचे आयुष्य 3.5 वर्षापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रिसर्च मध्ये सर्व सामान्य यूरोपीय आणि अमेरिकी आहार पद्धतीची तुलना कॉम्प्युटरच्या माध्यमातून करण्यात आली होती. हा अभ्यास जे वय आणि आहार पद्धती तसेच आरोग्याशी असलेल्या समस्या यावर आधारित होता. या रिसर्च मध्ये असे सांगण्यात आले की ,जर एखाद्या 20 वर्षीय व्यक्तीने आपल्या आहारामध्ये प्रत्येक दिवशी 200 ग्रॅम कडधान्य व डाळींचे सेवन केले तर अशावेळी त्याचे वय 2.5 वर्षापर्यंत वाढू शकते.

रिसर्च नुसार कडधान्य व डाळी मध्ये फॅटची मात्रा कमी असते परंतु प्रोटीन, फायबर, विटामिन आणि वेगवेगळे मिनरल भरपूर मात्रा मध्ये आपल्याला उपलब्ध होतात म्हणूनच जर एखाद्या व्यक्तीला आपल्या वय वाढवायचे असेल तर अशा व्यक्तीने दिवसभरातून 225 ग्रॅम डाळ, ब्राउन राईस सोबतच 25 ग्राम वेगवेगळे डाळींचा समावेश आपल्या आहारामध्ये नक्कीच करायला हवा.

रेड आणि प्रोसेस्ड केलेले मांसाहारचे करू नये सेवन

यासोबतच एक्सपर्ट मंडळींनी सांगितले आहे की, रेड आणि प्रोसेस्ड केलेले मांसाहार पदार्थ सेवन अजिबात करू नये कारण की यामध्ये फॅट आणि मिठाचे प्रमाण अधिक असते. जर तुम्ही हे पदार्थ पूर्णपणे सेवन करण्याचे बंद केल्यास तुमचे जीवन 4 वर्षांनी वाढू शकते.

या रिसर्चचे प्रमुख लेखक आणि न्यूट्रिशन एक्सपर्ट प्रोफेसर लार्स फडनेस (Lars Fadnes) यांच्या मते, आपल्या शरीराच्या आवश्यकतेनुसार व गरजेनुसार योग्य तो आहार प्रत्येकाने करायला हवा सोबतच जर तुम्हाला तुमचे आरोग्य सुधारायचे असेल तर अशावेळी पोषक तत्त्वांनी भरपूर असलेले अन्नपदार्थांचा समावेश सुद्धा आपल्या आहारामध्ये करायला हवा.

टिप्स : टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित बातम्या

Oral Cancer : ‘या’ गोष्टींची काळजी घेतल्यास कधीच होणार नाही तोंडाचा कर्करोग

सावध व्हा… लहान मुलांमध्ये कर्करोगाचा धोका वाढतो आहे. लक्षणे आणि उपाय जाणून घ्या

Health tips : ‘हे’ घरगुती उपाय आहेत मधुमेहावर रामबाण इलाज

 

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.