Health : पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा नक्की समावेश, काहीच दिवसात दिसेल फरक!

यूरिक ॲसिडचा त्रास असलेल्यांनी त्यांच्या आहारात काही फळांचा समावेश करणे गरजेचे आहे, जेणेकरून त्यांना ह्या समस्या सतावणार नाही. तर आता आपण या पाच फळांबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचा यूरिक ॲसिडचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

Health : पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आहारात या गोष्टींचा करा नक्की समावेश, काहीच दिवसात दिसेल फरक!
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 11:44 PM

मुंबई : भरपूर लोकांना यूरिक ॲसिडची समस्या सतावत असते. शरीरामध्ये प्युरीनचे प्रमाण वाढले तर यूरिक ॲसिडची समस्या निर्माण होते. या समस्येमुळे सांध्यांमध्ये सूज निर्माण होणे, वेदना होणे किंवा लघवीची संबंधित समस्या निर्माण होतात. तर  यूरिक ॲसिडची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी तुमच्या आहारात देखील विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.  तर तुमच्या आहारात पौष्टिक पदार्थ, फळे, भाज्या यांचा समावेश करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपली पचनक्रिया मजबूत होते तसेच यूरिक ॲसिड देखील नियंत्रणात राहते.

सफरचंद हे फळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे डॉक्टर देखील प्रत्येकाला आहारात सफरचंदाचा समावेश करायला सांगतात. तर सफरचंद खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील यूरिक ॲसिडचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच सफरचंद खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील जे गलिच्छ यूरिक ॲसिड आहे ते बाहेर पडते. तसेच आपल्या शरीराला फायबर, जीवनसत्वे, प्रोटीन देखील मिळते. त्यामुळे सफरचंदाचा तुमच्या आहारात समावेश करा.

अननसाचा देखील तुमच्या आहारात समावेश करा. हे एक लिंबूवर्गीय फळ आहे जे तुमचे यूरिक ॲसिड नियंत्रणात आणण्यास मदत करते. अननसामध्ये विटामिन सी, आवश्यक पोषक घटक असतात जे तुमचे यूरिक ॲसिड नियंत्रणात आणण्यास मदत करतात. अननसामुळे आपल्या शरीराला फायबर देखील मिळते तसेच आपली पचन क्रिया देखील सुधारते.

संत्री आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. तसेच जर तुम्हाला यूरिक ॲसिडची समस्या असेल तर संत्र्याचा समावेश तुमच्या आहारात नक्की करा. कारण संत्री हे आपल्या शरीरातील यूरिक ॲसिड नियंत्रणात आणण्यास मदत करते. तसेच आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटक देखील देण्यास मदत करते. त्यामुळे संत्री आवर्जून खा.

चेरी खायला खूप गोड असते आणि ती बहुतेक लोकांना आवडतेही. तर ही चेरी तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. चेरीमध्ये काही असे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील यूरिक ॲसिड कमी करण्यास मदत करते. त्यामुळे चेरी तुम्ही आवर्जून खा त्यामुळे तुमचा यूरिक ॲसिडचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

नाशपती हे फळ खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील यूरिक ॲसिडचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. हे फळ अनेक पोषक तत्त्वांनी भरलेले असते, तसेच या फळांमध्ये फायबर देखील असते जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे नाशपती फळ खाणं खूप फायदेशीर ठरतं. हे फळ खाल्ल्यामुळे आपले वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....