Healthy drinks : तुमच्याही मुलांवर तणाव जाणवतो? ‘ही’ सुपरड्रिंक्स ठरतील प्रभावी
Healthy drinks : मुलावर येणारा ताण कमी करण्यासाठी तुम्ही त्याला अशा पदार्थांचे सेवन करायला लावू शकता, ज्यामुळे त्याचे मन शांत होईल, मनावरील ताण तणाव दूर होण्यास मदत होईल. यासाठी तुम्ही काही हेल्दी ड्रिंक्सची मदत घेऊ शकता.
Healthy drinks : मार्च महिन्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला असतो. त्यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होत असतात. शिवाय याच महिन्यात मुलांना परीक्षा आणि निकाल या दोन्ही महत्त्वाच्या टप्प्यांचा सामना करावा लागतो. पालकही परीक्षा आणि निकालाच्या तयारीत गुंतलेले असतात. परीक्षांमुळे मुलांना शाळा, महाविद्यालयांशिवाय इतर क्लासेसला जावे लागते आणि त्यामुळे मुलांचे वेळापत्रक फार तणावपूर्ण तयार होते. परीक्षेच्या काळात मुलांच्या खाण्या-पिण्याच्या, झोपण्याच्या वेळेचाही भंग होतो. या गोष्टींमुळे बालकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. काही वेळा पहिले परीक्षा (Examination) आणि नंतर निकालाचे टेन्शन यामुळे मुलेही तणावात येतात. काही प्रकरणांमध्ये, हा ताण (Stress) इतका वाढतो की मूल त्याच्या दैनंदिन कामातही लक्ष केंद्रित करू शकत नाही. मुलावर येणारा ताण कमी करण्यासाठी काही हेल्दी ड्रिंक्सची (Healthy drinks) मदत घेऊ शकता. या लेखात त्याबाबत चर्चा करणार आहोत.
स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी
या दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटि-ऑक्सिडंट्स, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक योग्य प्रमाणात उपलब्ध असतात. आपण ते मुलाच्या आहाराचा एक भाग बनवू शकता आणि याचे दररोज सेवन केले जाउ शकते. विशेष म्हणजे हे आरोग्यदायी असण्यासोबतच खूप चवदार आहे. याचे सेवन केल्याने मुलांना उत्साही वाटेल आणि शरीराच्या अनेक समस्याही दूर होतील. तज्ज्ञांच्या मते, या दोघांपासून बनवलेली स्मूदी प्यायल्याने मुलांचा मेंदूही तीक्ष्ण होईल.
बदाम दूध
बदाम हा मेंदूला चालना देणार्या महत्त्वाच्या पोषक तत्वांचा उत्तम स्रोत मानला जातो. स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी तज्ज्ञ बदाम खाण्याचा सल्ला देतात. जर तुमचे मूल वारंवार विसरत असेल आणि तो तणावातही असू शकतो. त्यामुळे त्याला रोज बदामाचे दूध प्यायला द्या. त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स मेंदूला चांगली चालणा देण्याचे काम करतात. तसेच, याचे सेवन केल्याने मुलांचा ताण दूर होऊन त्याला आराम वाटेल.
गुळाचा चहा
गूळ आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. घरी सहज उपलब्ध होणारा गुळाचा चहा पिण्यात एक वेगळाच आनंद असतो. हे चवदार तसेच आरोग्यदायी आहे. यापासून बनवलेला चहा प्यायल्याने तणाव कमी होतो. तुमच्या मुलाला दिवसातून एकदा गुळाचा चहा पिण्याची सवय लावा. वारंवार सर्दीचा त्रास होत असेल तर गुळाचा चहा प्यायल्याने आराम मिळतो.
(या लेखात दिलेला मजकूर उपलब्ध माहितीवर आधारीत आहे. याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)