Guava Leaves: केसगळतीमुळे त्रस्त असाल तर करा पेरुच्या पानांचा वापर, काही दिवसांतच दिसेल फरक !

पेरुच्या पानांच्या मदतीने तुम्ही केसगळतीची समस्या सहजपणे थांबवू शकता. पेरुच्या पानांमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात जे केवळ आपल्या शरीरासाठीच नव्हे तर केसांसाठीही फायदेशीर असतात.

Guava Leaves: केसगळतीमुळे त्रस्त असाल तर करा पेरुच्या पानांचा वापर, काही दिवसांतच दिसेल फरक !
केसगळती Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 2:35 PM

Guava Leaves Hair fall Home Remedy: ऋतू बदलताच अनेक लोकांना केस गळण्याचा (Hair Fall problem) त्रास होतो. मात्र खराब लाइफस्टाईल, (Bad lifestyle) अपुरी झोप आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ही समस्या आणखीनच वाढते. जर तुम्हालाही केस गळणे, ते निर्जीव होणे, पटकन तुटणे अशा समस्यांमुळे त्रास (Hair Problem) होत आहे का ? पेरुच्या पानांच्या मदतीने ही समस्या दूर होऊ शकते. पेरू खाण्याचे बरेच फायदे तुम्ही आत्तापर्यंत ऐकले असतील मात्र त्याची पानेही खूप लाभदायक असतात. पेरुच्या पानांच्या मदतीने तुम्ही केसगळतीची समस्या सहजपणे थांबवू (Hair care) शकता. पेरुच्या पानांमध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात जे केवळ आपल्या शरीरासाठीच नव्हे तर केसांसाठीही फायदेशीर असतात. कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करणे असो वा वजन कमी करायचे असेल, पेरूची पाने हा या सर्वांवरील रामबाण उपाय आहे. एवढेच नव्हे तर पेरूच्या पानांमुळे केस गळती कमी होते तसेच केस खराब होणेही थांबते.

पेरूच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्वं असतात. तसेच ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्मही मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे केस सुंदर होतात, तसेच त्यांची वाढही चांगली होते. पेरुच्या पानांचा केसांसाठी वापर केल्याने केस मऊ, मुलायम आणि चमकदार होतात. त्या पानांमधील ‘ व्हिटॅमिन सी ‘ मुळे केसगळतीची समस्या दूर होते. पेरूच्या पानांचा योग्य वापर कसा करावा जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

असा करा पेरूच्या पानांचा वापर –

केसगळती कमी व्हावी यासाठी पेरूच्या पानांचा वापर करायचा असल्यास प्रथम एका भांड्यात एक लिटर पाणी घ्यावे. ते कमीत कमी 20 मिनिटे उकळू द्यावे. नंतर त्यामध्ये पेरूची पाने घालावीत. हे मिश्रण थंड होऊ द्यावे. त्यानंतर ते पाणी एका बाटलीत भरून ठेवावे. केस शांपूने धुण्यापूर्वी काही तास आधी, पेरूच्या पानांचे तयार केलेले पाणी हातावर घ्यावे आणि केसाच्या मुळांना नीट चोळून लावावे. काही तास ते तसचे राहू द्यावे. त्यानंतर केस शांपूने स्वच्छ धुवावेत. नियमित वापराने अपेक्षित बदल दिसून येईल. हे मिश्रण केसांना लावून थोड्या वेळाने केस धुतल्यास तुमची केसगळती कमी होईल, तसेच केस चममकदार आणि हेल्दी बनतील.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.