Heatstroke Protection : उन्हाळ्यात उष्मघातापासून बचाव करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा ट्राय…
How to Protect Yourself From Heatstroke : उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका वाढतो, त्यामुळे लोक लवकर आजारी पडतात, परंतु आता घाबरण्याची गरज नाही. तज्ञांनी त्याचे घरगुती उपाय शेअर केले आहेत.

उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडक उन्हामुळे अनेकांना उष्मघाताच्या समस्या होतात. उष्मघातामुळे अनेक लोकांना खूप त्रास होतो. उन्हाळा सुरू होताच तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्या होतात. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. उन्हाळ्यात वातावरणामधील उष्णतेमुळे होणारा उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य तज्ञांकडून अनेक उपाय सांगितले आहेत. वातावरणातील उष्णतेमुळे, शक्तपणा जाणवतो किंवा उन्हामुळे शरीर डिहायड्रेट होते आणि कधीकधी असे होते की एखाद्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही घरी या 4 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही या सर्व गोष्टी सहजपणे टाळू शकता.
उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे
उन्हाळ्यात तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. आहार तज्ञांच्या नुसार, उन्हाळा सुरू होताच दिवसभरात 4-5 लिटर पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फळांचा आहारात समावेश कर. जर एखाद्या व्यक्तीने उष्माघात टाळण्यासाठी घरी काही गोष्टी केल्या तर तो उष्माघातापासून सहज बचावू शकतो. चला जाणून घेऊयात उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे?
सूर्यकिरणे थेट डोक्यावर पडली तरच स्ट्रोकचा धोका
उष्मघातापासून बचाव करण्यासाठी सर्वप्रथम, जेव्हा तुम्ही कुठेही बाहेर जाल तेव्हा तुमचे डोके झाकून घ्या. दुपारच्या सूर्यप्रकाशाचे तीव्र सूर्यकिरणे थेट डोक्यावर पडली तरच स्ट्रोकचा धोका खूप जास्त असतो. याशिवाय दुपारी सॅलड आणि डाळी यासारख्या गोष्टी जास्त खा. या ऋतूत पपई आणि टरबूज सर्वात फायदेशीर असतात. तुमच्या आहारात या दोन्ही फळांचा समावेश नक्की करा. दररोज कच्चा कांदा खा आणि 3 ते 4 लिटर पाणी प्या. दर तासाला किमान एक ग्लास पाणी प्यायला विसरू नका. जर शरीर डिहायड्रेटेड राहिले आणि तुम्ही बाहेर गेलात तर उष्माघात होण्याची शक्यता नक्कीच असते.
हा साधा रस घरी बनवू शकता
भाज्यांमध्ये, भोपळा किंवा हिरव्या पालेभाज्या सारख्या भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. कारण त्यात 90% पाणी असते. जास्त धान्य खाऊ नका. जास्तीत जास्त डाळी आणि भाज्या खा किंवा फक्त सॅलडने पोट भरण्याचा प्रयत्न करा. भोपळा आणि पालकाचा रस. तुम्ही हा साधा रस घरी बनवू शकता आणि पिऊ शकता. तुम्ही सत्तू पिऊ शकता, ते खूप महाग नाही आणि बजेटमध्ये किंवा सफरचंदाचा रस देखील आहे. हे सर्व पदार्थ स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे. जर तुम्ही दररोज एक ग्लास हे प्यायले तर तुम्हाला नक्कीच फायदे दिसतील.
अर्ध्या तासाने पाणी प्या
उन्हाळ्यात जेव्हाही तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमचे डोके व्यवस्थित झाकून ठेवा. जर तुम्ही गाडी चालवत असाल तर गाडी चालवताना हेल्मेट घाला आणि बाहेरून घरी आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. तुमच्या शरीराला खोलीच्या तापमानावर थोडा आराम द्या. त्यानंतरच पाणी प्या. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही उष्माघातापासून नक्कीच सुरक्षित राहाल. त्यासोबतच प्रत्येक अर्ध्या तासाने पाणी प्यावे.
