Health: त्वचेसाठी विषासमान आहेत या चार गोष्टी, लगेच करा बंद!
अकाली म्हातारपण कुणालाच आवडत नाही. त्यात चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या तर अधिकच लाजिरवाणे वाटते. हे टाळायचे असेल तर आहारातील या गोष्टींना व्यर्ज करणे आवश्यक आहे.
मुंबई, चेहऱ्यावर सुरकुत्या (Wrinkle on face) पडणे म्हणजे वृध्दत्वाकडे (Aging) वाटचाल सुरु झाल्याचे संकेत असल्याचे सहसा मानले जाते, मात्र आधुनिक काळात एन चाळिशीतच चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागल्या आहेत. वृद्धत्वाला दूर ठेवण्यासाठी तुमचा आहार आणि जीवनशैली खूप महत्त्वाची भूमिका बजावते. अशा काही गोष्टी आहेत ज्या पाळल्याने वृद्धत्वाला दूर ठेवता येईल (Anti-aging Tips). यामध्ये आहारातल्या काही घटकांचा समावेश आहे. आहारात या गोष्टींचे सेवन केल्याने तुम्ही वेळेपूर्वी म्हातारे दिसू लागता.
- तळलेले अन्न पदार्थ- बऱ्याच जणांना तळलेले पदार्थ खूप आवडतात. अशा पदार्थांचे सेवन एखाद वेळेस करायला हरकत नाही, पण जर तुम्ही तळलेले आणि तेलकट पदार्थ रोज खाल्ले तर तुमच्या त्वचेसाठी आणि एकंदरीतच तुमच्या आरोग्यासाठीही खूप घातक ठरू शकते. त्यामुळे तेलकट पदार्थांना आहारातून व्यर्ज करा.
- साखर- साखरेचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. आरोग्य तज्ञ देखील साखरेचा कमीत कमी वापर करण्याचा सल्ला देतात. अन्नामध्ये साखरेच्या अतिवापरामुळे त्वचेची चमक हळूहळू संपते. तळलेल्या पदार्थांप्रमाणे, पांढरी साखर कोलेजन-उत्पादकाच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊ शकते. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या, बारीक रेषा वाढू लागतात.
- लोणी- लोणीचे अतिसेवन त्वचेसाठी चांगले मानले जात नाही. एका अभ्यासानुसार, जे लोक लोणी किंवा बटर अजिबात घेत नाहीत त्यांच्यामध्ये सुरकुत्या, बारीक रेषा आणि त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता फार कमी असते. तर जे लोक भरपूर लोणी किंवा बटर खातात त्यांच्यामध्येही ही समस्या खूप जास्त आढळून येते. ट्रान्स फॅट आणि वनस्पती तेलापासून मार्गरीन तयार केले जाते, त्यामुळे ते आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर ठरत नाही. अशा परिस्थितीत मार्जरीनचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. ते त्वचेची कोलेजन आणि लवचिकता खराब करते. त्याऐवजी तुम्ही जेवणात ऑलिव्ह ऑईल किंवा एवोकॅडो तेल वापरू शकता. हे त्वचेसाठी योग्य मानले जाते.
- दुग्धजन्य पदार्थ- दुग्धजन्य पदार्थांबाबत प्रत्येकाचे मत वेगळे असते. काही जण दुग्धजन्य पदार्थांना आरोग्यासाठी फायदेशीर मानतात, तर काही जण ते आरोग्यासाठी वाईट मानतात. याबाबत अनेक अभ्यास करण्यात आले आहेत. काहींना दुग्धजन्य पदार्थांमुळे त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते, तर काहींना कोणताही परिणाम दिसत नाही. वैज्ञानिकदृष्ट्या, दुग्धजन्य पदार्थ शरीरात जळजळ वाढवू शकतात, ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव होतो. ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे तुम्ही अकाली वृद्ध दिसू शकता.
हे सुद्धा वाचा