मुंबई : मधुमेहाच्या रूग्णाला नियमित प्रमाणात पोषक आहार घेणे अत्यंत महत्वाचे असते. आहाराचा मुख्य हेतू शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करणे असते. मधुमेहाचे रुग्ण अनेकदा त्यांच्या आहाराबद्दल गोंधळलेले असतात. तज्ञांच्या मते, मधुमेह हा एक सामान्य आजार आहे. असे असूनही, लोकांमध्ये या रोगाबद्दल अनेक गैरसमज आहेत. ज्यावर ते सहज विश्वास ठेवतात. चला जाणून घेऊया त्या 5 गैरसमजांबद्दल.
1. मधुमेहामध्ये कार्ब्स खाऊ शकत नाही
मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहारात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करू नये. असे नेहमीच म्हटंले जाते. बहुतेक लोक यावर विश्वास ठेवतात. तज्ञांच्या मते, कार्बोहायड्रेट्स आरोग्यासाठी वाईट नाहीत. परंतु कोणत्या प्रकारात आणि कोणत्या प्रमाणात खाल्ले जात आहे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मधुमेही रुग्णांनी पास्ता सारखे परिष्कृत कार्बोहायड्रेट, पांढरी ब्रेड सारखी उत्पादने खाणे टाळावे.
2. किती प्रमाणात फॅट्स घ्यावेत
आहारात चरबीचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. पण निरोगी चरबी खा. पोषणतज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात संतृप्त चरबी खाल्ल्याने अस्वास्थ्यकरित्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. यामुळे, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
3. आर्टिफिशियल स्वीटनर सुरक्षित आहेत
बाजारात आर्टिफिशियल स्वीटनर उत्पादनांची कमतरता नाही. जी विशेषतः मधुमेही रुग्णांसाठी तयार केली गेली आहे. पण सत्य हे आहे की कृत्रिम स्वीटनर्स इन्सुलिन प्रतिकार खराब करतात. तज्ञांच्या मते, अनेक हानिकारक रसायने साखर मुक्त उत्पादनांमध्ये मिसळली जातात. हे आपल्या आरोग्यासाठी अधिक हानिकारक आहे.
4. गोड पदार्थ खाणे टाळा
मधुमेहाची औषधे घेणे याचा अर्थ असा नाही की आपण मिठाई खाऊ शकता. पोषणतज्ज्ञांच्या मते, मधुमेही रुग्णाने पोषक तत्वांचा आहार घ्यावा. त्यासोबत औषधे घ्या. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि मधुमेहाचा धोका कमी होण्यास मदत होते.
5. मधुमेहासाठी फळे चांगली नाहीत
फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. यामुळे मधुमेही रुग्ण फळांचे सेवन करत नाहीत. फळांमध्ये अनेक पोषक असतात, त्यामुळे ते आरामात खाल्ले जाऊ शकतात. कोणत्याही फळाच्या रसाऐवजी फळे खा.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Health Tips, 5 special tips for diabetics)