हिवाळ्यात वारंवार ‘उच्च रक्तदाबा’ची समस्या उद्भवतेय? मग ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या!

रक्तदाब हा आजार 'साइलेंट किलर' म्हणूनही ओळखला जातो. विशेष म्हणजे हिवाळ्याच्या हंगामात या समस्येमुळे अनेक लोक त्रासलेले आहेत.

हिवाळ्यात वारंवार ‘उच्च रक्तदाबा’ची समस्या उद्भवतेय? मग ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या!
रक्तदाब हा आजार 'साइलेंट किलर' म्हणूनही ओळखला जातो.
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 5:11 PM

मुंबई : धकाधकीच्या आयुष्यात बदलती जीवनशैली आणि पौष्टिक आहाराच्या अभावामुळे आपल्यापैकी बरेच लोक उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहे. रक्तदाब हा आजार ‘साइलेंट किलर’ म्हणूनही ओळखला जातो. विशेष म्हणजे हिवाळ्याच्या हंगामात या समस्येमुळे अनेक लोक त्रासलेले आहेत. या हंगामात काही रुग्णांचा रक्तदाब सतत खाली-वर जात राहतो. कारण थंडीमुळे शरीरात रक्तपुरवठ्यासाठी हृदयावर जास्त दबाव येत असतो, म्हणून ही समस्या वारंवार उदभवते. हृदयाला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या आणि हृदयावर जास्त दाब झाल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. ज्यामुळे त्या व्यक्तीच्या हृदय, मूत्रपिंडावर, डोळ्यांवर वाईट परिणाम होतो आणि त्याला डिमेंशिया सारख्या आजाराचा धोका देखील निर्माण होतो (Health tips for High Blood pressure issue during winter).

हिवाळ्याच्या काळात ‘ही’ लक्षणे देतील उच्च रक्तदाबाचे संकेत :

– डोकेदुखी

– घाम येणे

– पाचन तंत्रात बिघाड

– घुसमटल्यासारखे वाटणे

उच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय करावे?

दररोज व्यायाम करा

उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी, दररोज कमीतकमी अर्धा तास हृदय व्यायाम करा.

आहारात कमी मीठ

आहारात मीठाचे सेवन कमी करा. आहारातील बहुतेक सोडियम हे पॅक प्रोसेस्ड केलेल्या अन्नातून येतात, जे टाळणे अतिशय आवश्यक आहे.

ध्यानधारणा करा

संशोधनानुसार, ध्यानधारणा करण्याचे वेगवेगळे मार्ग केवळ एखाद्या व्यक्तीचा ताणतणाव दूर करत नाहीत, तर उच्च रक्तदाबही नियंत्रित करतात.

तूप-तेलाचा कमी वापर

फास्ट फूड, मॅगी, चिप्स, सॉस, चॉकलेट, शुद्ध तूप, भजी किंवा नारळ तेल यासारखे संतृप्त चरबी असणारे घटक सेवन करणे टाळा (Health tips for High Blood pressure issue during winter).

संगीत आणि नृत्य

उच्च रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी ताण, थकवा आणि तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. यासाठी संगीत ऐका, मूड हलका ठेवण्यासाठी नृत्य करा.

आरोग्यदायी आहार

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी, ज्वारी, बाजरी, गहू, ओटचे जाडे भरडे पीठ आणि स्प्राउट्स इत्यादी उच्च फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. तसेच, दररोज किमान 10 ग्लास पाणी प्या.

उन्हात बसा

त्वचेच्या थरात असलेले नायट्रिक ऑक्साईड रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. जेव्हा त्वचेवर सूर्यप्रकाश पडतो, तेव्हा त्वचेत नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. यासाठी सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात काही वेळ बसा.

नारळ पाणी

नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात सोडियमचा प्रभाव कमी होण्यास मदत होते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health tips for High Blood pressure issue during winter)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.