Health Tips : व्यायाम करताना का? वाढतो हार्ट अटॅकचा धोका..! जाणून घ्या, फिट-हेल्दी राहण्यासाठी जिममध्ये काय करावे आणि काय नाही?

गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहिली तर असे दिसून येते की, तरुणांमध्ये हृदयरोग आणि हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी शारीरिक हालचालींचा विचार केला जातो, परंतु गंभीर बाब म्हणजे जिममध्ये अनेकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असल्याचे दिसून आले आहे.

Health Tips : व्यायाम करताना का? वाढतो हार्ट अटॅकचा धोका..! जाणून घ्या, फिट-हेल्दी राहण्यासाठी जिममध्ये काय करावे आणि काय नाही?
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 1:38 PM

अलीकडेच कॉमेडीयन राजू श्रीवास्तवपासून अभिनेता सिद्धार्थ शुक्लापर्यंत यांना जिम करत असताना हृदयविकाराचा झटका आला. अशा परिस्थितीत जिम मध्ये व्यायामासाठी जाणाऱ्यांमध्ये एवढी गंभीर समस्या (Serious problem) का वाढत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी मी जिमला जाणे बंद करावे का? असा प्रश्न तरुणांना पडतो. हृदयरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित व्यायाम हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे व्यायामशाळेत(जिम्नॅशियम) जाणे हा पर्याय नाही. सर्वप्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की, व्यायाम करतानाच लोकांना जिममध्ये हृदयविकाराचा झटका का येतो? जोखीम समजून घेतल्यानंतर, आपल्याला ते टाळण्याचे मार्ग अवलंबावे लागतील. हृदयविकाराचा झटका (A heart attack) जिममध्ये गेल्याने येत नाही. परंतु, आपल्या काही चुका आणि समस्यांमुळे त्याचा धोका वाढतो. जो सर्वांनीच जिम मध्ये व्यायाम करताना (while exercising) सतत टाळला पाहिजे.

डॉक्टर काय म्हणतात?

लखनौमधील रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रभाकर अवस्थी सांगतात की, काही प्रकरणांमुळे जिममध्ये जाण्याबाबत लोकांच्या मनात भीती निर्माण होत आहे. दरम्यान, जर आपण काही आवश्यक खबरदारी घेतली तर आपण अशा धोक्यांपासून सुरक्षित राहू शकतो. प्रत्येक व्यक्तीचे शरीर, ताकद आणि तग धरण्याची क्षमता वेगळी असते हे समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. जर आपण आपल्या क्षमतेनुसार जिममध्ये व्यायाम करत असू तर ते सुरक्षित आहे. जर तुम्हाला आधीच हृदयविकार किंवा श्वासोच्छवासाशी संबंधित काही समस्या असतील तर, या संदर्भात तुमच्या तज्ञांच्या सल्ल्यानुसारच जिम किंवा व्यायाम निवडा. काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही धोका कमी करू शकता.

जिम करताना या गोष्टी लक्षात ठेवा

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जिम दरम्यान कोणत्याही प्रकारची समस्या टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी चांगले उबदार होणे आणि व्यायामानंतर शरीर थंड करणे खूप महत्त्वाचे आहे. हे हृदयावरील अतिरिक्त दबाव कमी करण्यास मदत करते. व्यायाम करताना हलके कपडे परिधान करा, जिथे तुम्ही जिम करता, तिथे वेंटिलेशनची चांगली व्यवस्था असावी हे लक्षात ठेवा. फिटनेस ट्रेनरच्या देखरेखीखाली व्यायाम केल्याने कोणत्याही प्रकारचा धोका कमी होऊ शकतो.

अशा चुका टाळा

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका किंवा इतर प्रकारच्या दुखापतींचे मुख्य कारण म्हणजे आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलू लागतो किंवा कमी वेळात अधिक व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो. जास्त लाभ मिळवण्यासाठी अधिक तीव्रतेचा व्यायाम करतो. व्यायाम नेहमी तुमचा स्टॅमिना लक्षात घेऊनच केला पाहिजे. व्यायामादरम्यान तुम्हाला वेदना, अस्वस्थता, मळमळ, चक्कर येणे किंवा छातीत दुखत असल्यास, व्यायाम ताबडतोब थांबवा. जर तुम्हाला आधीच हृदयविकाराचा त्रास होत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्यायाम करा आणि स्वतःसाठी नेहमीच योग्य व्यायामाची निवड करा. जेणेकरून हृदयावर अतिरिक्त दबाव पडणार नाही.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.