World Thrombosis Day 2022: रक्ताच्या गुठळ्यांमुळे येऊ शकतो हार्ट ॲटॅक, दर 4 व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू

थ्रोम्बोसिस होणारी गुंतागुंत गुठळ्या (क्लॉट्स) कोठे आहेत यावर अवलंबून असते आणि स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि श्वासोच्छवासाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

World Thrombosis Day 2022: रक्ताच्या गुठळ्यांमुळे येऊ शकतो हार्ट ॲटॅक, दर 4 व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 12:48 PM

जगभरात हृदयरोगाची प्रकरणे वाढत असताना, थ्रोम्बोसिस (Thrombosis) ही एक सामान्य समस्या बनली आहे आणि जगभरातील मृत्यू होण्याचे एक प्रमुख कारण बनले आहे. थ्रोम्बोसिस म्हणजे धमनी किंवा नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या (blood clot) तयार होणे, ज्यामुळे रक्त योग्यप्रकारे वाहण्यापासून प्रतिबंध होतो. यामुळे आरोग्याच्या गंभीर (health disease) समस्या उद्भवू शकतात. थ्रोम्बोसिस हा जीवघेणा ठरू शकतो आणि त्याचा परिणाम कोणत्याही वयोगटातील व्यक्तीवर होऊ शकतो.

हे जगभरात होणाऱ्या मृत्यूमागचे आणि अपंगत्वाचे एक प्रमुख कारण बनले आहे. थ्रोम्बोसिसमुळे येणारा हृदयविकाराचा झटका, थ्रोम्बोम्बोलिक स्ट्रोक आणि थ्रोम्बेम्बोलिजम (व्हीटीई) हे तीन कार्डिओव्हॅस्क्युलर किलर म्हणून ओळखले जातात, ज्यामुळे दर चारपैकी एका व्यक्तीचा मृत्यू होतो.

ब्लड क्लॉटची (रक्ताची गुठळी) समस्या गंभीर –

हे सुद्धा वाचा

रक्ताची गुठळी तयार होणे ही शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे आणि त्याला कोग्युलेशन या नावानेही ओळखले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती जखमी होते, तेव्हा या रक्ताच्या गुठळ्या शरीराचे संरक्षण करतात. शरीरातून जास्त रक्त वाहू नये म्हणून हे हे जखम सील करते. एकदा जखम बरी झाली की शरीर स्वतःहून या गुठळ्या फोडते, पण काही वेळा या गुठळ्या बरे होऊनही विरघळत नाहीत. इतर काही कारणास्तव शरीरात रक्ताच्या गुठळ्या देखील तयार होऊ शकतात. रक्तवाहिन्यांच्या आत असलेल्या या गुठळ्या थ्रोम्बी म्हणून ओळखल्या जातात आणि या वैद्यकीय स्थितीला थ्रोम्बोसिस असे म्हणतात.

थ्रोम्बोसिसचे मुख्य दोन प्रकार असतात –

– धमनी थ्रोम्बोसिस (Arterial thrombosis): रक्ताची ही गुठळी आहे धमनीमध्ये तयार होते. रक्तवाहिन्या या ऑक्सिजनयुक्त रक्त महत्त्वपूर्ण अवयवांपर्यंत नेत असल्याने, धमनीमध्ये असलेल्या गुठळ्यांमुळे हृदय किंवा मेंदूपर्यंत रक्तप्रवाह पोहोचण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होऊ शकतो.

– शिरांसंबंधी थ्रोम्बोसिस (Venous thrombosis): याचा अर्थ नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. बऱ्याच वेळा हे शरीराच्या खालच्या अवयवांच्या खोल शिरांमध्ये तयार होते आणि डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) म्हणून ओळखले जाते. रक्ताची ही गुठळी हृदय किंवा फुफ्फुसांमध्ये वाहून पोचतेते, हे venous thromboembolism किंवा VTE म्हणून ओळखले जाते. शरीराच्या नसा शरीराच्या सर्व भागांमधून रक्त पुन्हा हृदयाकडे घेऊन जातात. पायाच्या खोल शिरांमध्ये जेव्हा गुठळी तयार होते, तेव्हा त्याला डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) म्हणून ओळखले

थ्रोम्बोसिस मुळे येऊ शकतो हार्ट ॲटॅक – धमन्या कडक झाल्यामुळे धमन्यांमध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात. चरबी किंवा कॅल्शियम जमा झाल्यामुळे धमनीच्या भिंती जाड होतात तेव्हा या अवस्थेस आर्टिओ स्क्लेरोसिस (arteriosclerosis) नावाने ओळखले जाते. धमनीच्या भिंतींमध्ये प्लेक नावाचा चरबीयुक्त पदार्थ तयार झाल्यामुळे अचानक रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये धमनी थ्रोम्बोसिस होतो, तेव्हा यामुळे हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट ॲटॅक येऊ शकतो. त्याचप्रमाणे, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये थ्रोम्बोसिस झाल्यामुळेदेखील त्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो.

40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना, विशेषत: पुरुषांनी या लक्षणांबद्दल अधिक जागरूक असणे आवश्यक आहे. आणि लक्षणे दिसल्यास निदानासाठी डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. थ्रोम्बोसिसचा उपचार हा त्याच्या स्थितीच्या तीव्रतेवर अवलंबून असतो. नियमितपणे व्यायाम करणे, धूम्रपान न करणे, वजन कमी करणे आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल सारख्या आरोग्याच्या इतर समस्यांवर नियंत्रण ठेवून थ्रोम्बोसिसचा धोका कमी होऊ शकतो.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.