High BP: या सध्या उपायाने सहज नियंत्रित होतो उच्च रक्तदाब, अनेकांना नाही माहिती

उच्च रक्तदाबाचा त्रास अनेकांना होतो. यावर काही घरगुती उपाय आहेत ज्याद्वारे उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविता येते. जाणून घेऊया काय आहेत हे उपाय

High BP: या सध्या उपायाने सहज नियंत्रित होतो उच्च रक्तदाब, अनेकांना नाही माहिती
रक्तदाब (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 7:07 PM

मुंबई,  आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात  उच्च रक्तदाब (High BP) ही एक सामान्य मात्र गंभीर समस्या बनली आहे. त्याला सायलेंट किलर (Silent Killer)  असेही म्हणतात. याचे मुख्य कारण म्हणजे तणाव आहे. जास्त ताण घेतल्याने उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. या स्थितीत, व्यक्तीला अंधुक दृष्टी, तीव्र डोकेदुखी, नाकातून रक्त येणे, छातीत दुखणे सुरू होते. यासोबतच श्वास घेताना अस्वस्थता आणि थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. निष्काळजीपणामुळे हा आजार धोकादायक ठरतो. जर तुम्हीही उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल आणि उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवायचे असेल तर मधाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. याशिवाय स्वयंपाकघरात असलेल्या वस्तूंचे मधासोबत सेवन केल्यास उच्च रक्तदाबात लवकर आराम मिळतो.

मध

साखरेच्या रुग्णांना गोड पदार्थ खाण्यास मनाई आहे हे आपण सर्व जाणतो. यासाठी डॉक्टर मधुमेही रुग्णांना साखरेऐवजी मधाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. यामध्ये नियासिन, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन आणि अमिनो ॲसिड असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. याव्यतिरिक्त, मधामध्ये कमी ग्लायसेमिक तत्व असतात. मध आणि पाण्याच्या सेवनाने उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो.

सुंठ

तज्ज्ञांच्या मते, सुंठामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, फॉलिक ॲसिड आणि फॅटी ॲसिड यांसारखे आवश्यक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. याच्या सेवनाने उच्च रक्तदाबावर आराम मिळतो. यासाठी सुंठ पावडरमध्ये मध मिसळून सेवन करा. लक्षात ठेवा सुंठ हे गरम प्रकृतीचे असल्याचे. मर्यादित प्रमाणात याचे सेवन करा. मध आणि सुंठ यांचे सेवन केल्यास उच्च रक्तदाबावर आराम मिळतो. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने याचे सेवन करावे.

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.