High Cholesterol: रक्तवाहिन्यांमधील खराब कोलेस्ट्रॉल विरघळतील या 5 गोष्टी, प्रत्त्येकाने नक्की खावे

वाढलेल्या खराब कोलेस्टरॉलमुळे हृदयविकार आणि मधुमेहाच्या विळख्यात लवकर सापडल्या जाते. या पाच गोष्टी यापासून वाचवू शकतात.

High Cholesterol: रक्तवाहिन्यांमधील खराब कोलेस्ट्रॉल विरघळतील या 5 गोष्टी, प्रत्त्येकाने नक्की खावे
कोलेस्ट्रॉल Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 10:49 PM

मुंबई, वाढलेले कोलेस्टेरॉल (High Cholesterol) शरीरात हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण देते. उच्च कोलेस्ट्रॉलचे सर्वात मोठे कारण म्हणजे चुकीची जीवनशैली तर आहेच, या सोबतच ही समस्या अनुवांशिक देखील असू शकते किंवा शरीरात आधीपासून अस्तित्वात असलेल्या रोग आणि औषधांमुळे देखील होऊ शकते. उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack), मधुमेह  यासारख्या आजारांना बळी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी डॉक्टर बऱ्याचदा औषधे सुचवतात, पण असे काही पदार्थ आहेत जे तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवतात आणि कोणत्याही नकारात्मक प्रभावाशिवाय हृदयविकाराचा धोका देखील कमी करते.

  1. धने- धन्याचे पाणी रोज प्यायल्याने उच्च कोलेस्ट्रॉल कमी होते आणि शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. ते बनवण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे, प्रथम तुम्ही पाणी आणि धने उकळा आणि नंतर रात्रभर थंड करण्यासाठी ठेवा. त्याचे गाळलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या.
  2. हळद- हळदीच्या मदतीने तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेली चरबी कमी करता येते. हळदीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म देखील असतात. दररोज भाज्यांमध्ये हळद वापरल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तुम्ही झोपण्यापूर्वी एक ग्लास हळदीचे दूध देखील पिऊ शकता.
  3.  ग्रीन टी- दररोज एक कप ग्रीन टी उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. जे तुमच्या शरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉलची पातळी कमी करताना तुम्हाला निरोगी बनवण्यात मदत करते.
  4.  फायबर-  ओट्स, तांदूळ, फळे, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मटर, कडधान्ये यासारख्या खाद्यपदार्थांमध्ये विद्राव्य फायबर मुबलक प्रमाणात आढळते. हे उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
  5. हे सुद्धा वाचा
  6.  फ्लेक्स बिया-  फ्लेक्ससीड रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करते. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचा प्रभाव कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दररोज 30 ग्रॅम फ्लेक्ससीडचे सेवन करणे.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....