मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी गंभीर; पायाला जखमा होत असतील तर काळजी घ्या

पायांमध्ये असामान्य सूज, जळजळ, लालसरपणा आणि दुर्गंधी, पाय पाणचट, त्वचेचा रंग बदलणे, पाय सुन्न होणे आणि मुंग्या येणे, चालताना वेदना होणे, फोड येणे अशी लक्षणे दिसू लागतात.

मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी गंभीर; पायाला जखमा होत असतील तर काळजी घ्या
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या पायांना होणाऱ्या व्रण म्हणजे जखमा या त्यांच्यासाठी डोकेदुखी असतेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 10:54 AM

नवी दिल्लीः मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या पायांना होणाऱ्या व्रण  (Diabetic Foot Ulcer) म्हणजे जखमा या त्यांच्यासाठी डोकेदुखी असते. रक्तातील साखरेची समस्या (High Blood Sugar Level)वाढल्यामुळे  ही समस्या दीर्घकाळापर्यंत मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना त्रासदायक ठरणारी असते. सहसा हे व्रण अंगठ्याखाली आणि बोटांच्या खाली होत असतात. मधुमहे असणाऱ्या व्यक्तीला व्रणाची त्रास सुरु झाला तर त्वचेखाली असणाऱ्या पेशींचा (Cells) संबंध तुटतो, आणि त्याकाली एक प्रकारचा थर दिसू लागतो. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या हाडावरही होत असतो.

मधुमेह या आजाराचे तुम्ही जर रुग्ण असाल तर तुमच्या पायाला कधीही जखमा होऊ देऊ नका आणि कदाचित जखमा झाल्याच तर निष्काळजीपणा बाळगू नका. जखमा झाल्यानंतर ताबडतोब तज्ञांचा सल्ला घ्या अन्यथा ते गंभीर स्वरूप घेऊ शकतात आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून तुम्हाला त्रासदायक ठरु शकतात.

पायाला असणाऱ्या अल्सरची कारणे

मधुमेह असणाऱ्या पायाच्या अल्सरचे मुख्य कारण म्हणजे रक्तातील साखरेची पातळी प्रमाणाच्या बाहेर वाढणे. शुगर लेव्हल वाढल्यामुळे काही वेळा पायात आणि शरीराच्या इतर भागात लहान जखमा होतात. त्यावर वेळेत उपचार केले नाही तर गंभीर रुप धारण करु शकतात. त्यामुळे कधीकधी शस्त्रक्रियादेखील होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल आणि त्यांचे वजन जास्त असेल आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर त्याच्यासाठी डायबेटिक फूट अल्सरचा धोका कायम असतो.

काय असतात लक्षणे

पायांमध्ये असामान्य सूज, जळजळ, लालसरपणा आणि दुर्गंधी, पाय पाणचट, त्वचेचा रंग बदलणे, पाय सुन्न होणे आणि मुंग्या येणे, चालताना वेदना होणे, फोड येणे अशी लक्षणे दिसू लागतात. अनेक वेळा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, फक्त त्वचेचा रंग बदलतो किंवा वेदना जाणवतात. या परिस्थितीतही तुम्ही ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

कोणते उपचार घ्यायचे

डायबेटिक फूट अल्सरचे तज्ज्ञ रोगाच्या स्थितीनुसार निर्णय घेतात. सुरुवातीच्या टप्प्यात, औषधांद्वारे उपचार केले जाऊ शकतात. पण परिस्थिती गंभीर असेल तर शस्त्रक्रियाही करावी लागते. स्थिती गंभीर होण्यापासून रोखण्यासाठी, मधुमेहावर नियंत्रण ठेवणे आणि जखमेचे संक्रमण होण्यापासून संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे.

उपाय कोणते कराल

पाय नियमितपणे स्वच्छ करा.

– बोटांची नखे नियमितपणे कापा.

साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम करा आणि संतुलित आहार घ्या.

पायाचे तळवे कोरडे ठेवा.

शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासू देऊ नका. रोज सकाळी 9 वाजेपर्यंत सूर्यप्रकाश घ्या.

(या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर अवलंबून आहे. तज्ञांच्या सल्यानुसारच उपाय घेणे महत्वाचे )

संबंधित बातम्या 

Eye care: वाढत्या वयातही ‘या’ चार पध्दतीने डोळ्यांची कार्यक्षमता सुधारा

गर्भधारणेतील अनेक समस्यांपासून मिळेल आराम… ‘प्रेग्नंसी पिलो’चे फायदे जाणून घ्या

Diet : यो-यो डाएटने ह्रदयरोग अन्‌ मधुमेहाचा धोका?… ही माहिती अवश्‍य जाणून घ्या

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.