Health : अंड खाणं चांगलं पण या 3 लोकांसाठी हानिकारक, नक्की घ्या डॉक्टरांचा सल्ला !

बहुतेक लोक त्यांच्या आहारात अंड्याचा समावेश करतात. पण अंड जेवढं फायदेशीर आहे तितकंच काही लोकांसाठी हानिकारक देखील आहे. त्यामुळे आता आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या लोकांसाठी अंड खाणं हे हानिकारक ठरू शकतं.

Health : अंड खाणं चांगलं पण या 3 लोकांसाठी हानिकारक, नक्की घ्या डॉक्टरांचा सल्ला !
Follow us
| Updated on: Oct 15, 2023 | 8:07 PM

मुंबई : अंड हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. डॉक्टर देखील प्रत्येकाला अंड खाण्याचा सल्ला देतात, कारण अंड्यामध्ये काही असे गुणधर्म असतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. अंड्यामध्ये प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे असतात. त्यामुळे पौष्टिक आहारामध्ये अंड्याचा समावेश केला जातो. अंड हे आपली प्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. तसेच आपले हाडे मजबूत ठेवते, आपली त्वचा, केस देखील निरोगी ठेवण्यास मदत करते आणि आपल्याला ऊर्जा देखील देते त्यामुळे अंडे हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते.

ज्या लोकांना उच्च यूरिक ॲसिडचा त्रास असतो अशा लोकांसाठी अंड खाणे हानिकारक ठरू शकते. कारण अंड्यामध्ये प्रथिने असते तर याच प्रथिण्यामुळे प्यूरिन बाहेर पडते त्यामुळे यूरिक ॲसिडची समस्या आणखीन वाढण्याची शक्यता असते. तसेच अंड्यातील पिवळा बलकमधील कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणामुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे उच्च यूरिक ॲसिड असलेल्या रुग्णांनी अंड खाणे टाळावे. तसेच तज्ञांचा योग्य तो सल्ला घेऊनच आहार घेणे गरजेचे आहे.

अंड हे डायबिटीज असलेले लोकांसाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे डायबिटीज असलेले लोक त्यांच्या आहारात अंड्याचा समावेश करतात. अंड्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी प्रमाणात असते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण डायबिटीस असलेल्या लोकांनी अंड जास्त प्रमाणात खाऊ नये कारण अंड्यामध्ये जे पिवळे बलक असते त्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे  रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अंड जास्त प्रमाणात खाऊ नये.

अंड जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. ज्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल अशा लोकांनी अंड्याचा फक्त पांढरा भाग खावा त्यातील पिवळा बलक खाऊ नये. कारण अंड्यामधील पिवळ्या बलकमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त प्रमाणात असते, त्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंड जास्त प्रमाणात खाऊ नये जेणेकरून कोलेस्ट्रॉलचा धोका निर्माण होणार नाही.

Non Stop LIVE Update
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय.
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय.
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?.
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?.
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?.
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल.
महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपली, राज्यात कुठे किती टक्के झालं मतदान?
महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपली, राज्यात कुठे किती टक्के झालं मतदान?.
मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; काय घडलं?
मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; काय घडलं?.
एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?
एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?.