Eczema | ‘एक्झिमा’कडे दुर्लक्ष कराल तर त्वचा होईल खराब, धोका टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय!

एक्झिमा हा एक असा रोग आहे, ज्यामध्ये त्वचेवर तीव्र खाज सुटते आणि त्वचा कोरडी होते. काही लोकांमध्ये, ही समस्या इतकी वेदनादायक होते की, त्यांना खूप उपचार घ्यावे लागतात.

Eczema | ‘एक्झिमा’कडे दुर्लक्ष कराल तर त्वचा होईल खराब, धोका टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय!
त्वचेशी संबंधित ‘एक्झिमा’ या आजारामुळे देखील अनेक लोक त्रासलेल आहेत.
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 6:25 PM

मुंबई : एक्झिमा हा एक असा रोग आहे, ज्यामध्ये त्वचेवर तीव्र खाज सुटते आणि त्वचा कोरडी होते. काही लोकांमध्ये, ही समस्या इतकी वेदनादायक होते की, त्यांना खूप उपचार घ्यावे लागतात. हवामान बदलल्यामुळे ही समस्या आणखी वाढते. काही लोकांना तर इतकी तीव्र खाज येते की, त्वचेतून रक्त येऊ लागते. तसेच, यामुळे संसर्गाची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत आपण काही विशेष खबरदारी घेत या समस्येतून आराम मिळवू शकता (Home Treatment for Eczema).

त्वचा थंड ठेवा

एक्झिमामुळे आपल्या त्वचेत तीव्र खाज येत असेल, तर त्वचा थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी एक्झिमाच्या जागेवर आईसपॅक लावा किंवा थंड वस्तूने शेक द्या. प्लास्टिकच्या पिशवीत बर्फाचे तुकडे ठेवा आणि ती खाज सुटलेल्या भागावर लावा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.

अॅक्यूप्रेशर

नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाच्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की, हातावर विशिष्ट जागा दाबल्यामुळे शरीरावर कुठल्याही एक्झिमाची खाज कमी होते. हा एक्यूप्रेशर पॉईंट शोधण्यासाठी आपला डावा हात वाकवा आणि उजव्या कोपरच्या वर ठेवा. आपल्याला वरील स्नायूंमध्ये ताण जाणवेल. त्या जागेवर 3 मिनिटे हलक्या हातांनी दाबा.

मॉइश्चरायझरचा जाड थर

जर तुम्हाला एक्झिमा रोग असेल, तर मॉइश्चरायझरचा पातळ थर तुमच्यावर त्वचेवर काम करणार नाही. लोशन खरेदी करताना लक्षात ठेवा की, ते त्वचेच्या दुरुस्तीचे काम करेल. सेरामाइड असलेली क्रीम एक्झिमामध्ये देखील प्रभावी आहेत. आपण खाज आलेल्या भागावर पेट्रोलियम जेली देखील लावू शकता (Home Treatment for Eczema).

सूर्यफूल आणि नारळ तेल

सूर्यफूल बियाणांचे तेल प्रभावित क्षेत्र खूप मुलायम करते. इतर क्रिमच्या तुलनेत हे स्वस्त देखील आहे. त्याचप्रमाणे नारळ तेलामुळे एक्झिमाची खाज आणि सूज देखील कमी होते.

त्वचेचे रीहायड्रेट

प्रभावित भागाला 15 मिनिटांसाठी कोमट पाण्याने रीहायड्रेट करा. यानंतर हलक्या हातांनी स्वच्छ कपड्याने वाळवा. या ठिकाणी अजिबात घासू नका. यानंतर, या त्वचा मॉइश्चराइझ करा किंवा कोर्टिसोन क्रीम लावा.

ओल्या कपड्याने स्वच्छ करा

जर तुम्हाला तीव्र खाज सुटली असेल, तर ओल्या कपड्याने पुसल्यास आराम मिळेल. यासाठी, स्वच्छ कापडाने जखम पुसा आणि त्यावर आणखी एक सूती कपडा ठेवा. काही तास किंवा रात्रभर असे ठेवल्यास त्वचा खूप मऊ होईल आणि आपल्याला खाज सुटण्यापासून आराम मिळेल.

विश्रांतीची काही तंत्रे

ध्यान केल्यानेही एक्झिमाध्येही आराम मिळतो. यासाठी ध्यान करताना दीर्घ श्वास घ्या. यानेही आराम मिळेल.

(Home Treatment for Eczema)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.