कोरोना लसीच्या पहिला डोस ते दुसऱ्या डोस दरम्यानची गर्भधारणा किती सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..

भारत सरकारने सध्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना कोरोना लस घेण्याची तरतूद केली आहे. या व्यतिरिक्त आता गरोदर स्त्रियांसाठी लस मार्गदर्शक सूचना देखील आल्या आहेत. या वयोगटाला पुनरुत्पादक वयोगट म्हटले जाते, ज्यात बहुतेक विवाहित लोक फॅमिली प्लानिंग करत आहेत किंवा त्यांचे लग्न होणार आहे.

कोरोना लसीच्या पहिला डोस ते दुसऱ्या डोस दरम्यानची गर्भधारणा किती सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 3:55 PM

मुंबई : भारत सरकारने सध्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना कोरोना लस घेण्याची तरतूद केली आहे. या व्यतिरिक्त आता गरोदर स्त्रियांसाठी लस मार्गदर्शक सूचना देखील आल्या आहेत. या वयोगटाला पुनरुत्पादक वयोगट म्हटले जाते, ज्यात बहुतेक विवाहित लोक फॅमिली प्लानिंग करत आहेत किंवा त्यांचे लग्न होणार आहे. त्याचवेळी या गटामध्ये लसीशी संबंधित अनेक गैरसमज निर्माण होत आहेत (How safe is pregnancy between the first dose of corona vaccine and the second dose? Find out the opinion of experts).

उदाहरणार्थ, हे देखील प्रसारित केले गेले आहे की, कोरोना लसीमुळे वंध्यत्व किंवा नपुंसकत्व येऊ शकते. हे केवळ स्त्रियांबद्दलच नाही, तर पुरुषांबद्दलही सांगितले गेले. सफदरजंग हॉस्पिटलच्या अधिकारी आणि महिला व प्रसूतिशास्त्र विभागातील सहकारी प्राध्यापक डॉ. सुमित्रा बचानी यांच्याकडून कोरोना लस आणि प्रजनन विषयक विविध विषयांवर जाणून घेऊया…

नकारात्मक परिणाम नाहीत!

यूएसएमध्ये डिसेंबर 2020पासून म्हणजेच भारताच्या केवळ 16 दिवस आधीपासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. तेथे झालेल्या संशोधनात लसीनंतरचे परिणाम महिलांवर दिसू लागले. लसीकरणानंतर संशोधनात सामील झालेल्या बर्‍याच महिलांची गर्भधारणा झाली होती. या आधारावर असे म्हणता येईल की लस घेण्याने जननक्षमतेवर नकारात्मक परिणाम होत नाही. केवळ कोरोना लसच नाही, कोणत्याही लसीचे असे परिणाम दिसले नाहीत. बालपणातल्या अनेक आजारांपासून आपले संरक्षण करण्यासाठी आपल्या सर्वांना नियमितपणे लसीकरण केले जाते, वर्षानुवर्षे चालू असलेल्या या लसीकरणामुले प्रजनन क्षमता कमी करण्याचे परिणाम दिसले नाहीत. वास्तविक, लस विषाणूंविरूद्ध शरीरात संरक्षण कवच तयार करते, इतर कशावरही त्याचा परिणाम होत नाही. कोरोना लस घेतलेल्या एखाद्या महिलेस गर्भधारणा झाल्यास ती आपल्या बाळाला अँटीबॉडीज देऊ शकते, जेणेकरुन ही लस नवजात मुलास संसर्गापासून मुक्त ठेवेल.

लस घेणे सुरक्षित

डॉ. सुमित्रा बचानी म्हणतात की, ओपीडीमध्ये अनेक जोडपे आमच्याकडे येत आहेत आणि आम्हाला असे प्रश्न विचारात आहेत की, आम्हाला कुटुंब चालू ठेवायचे आहे किंवा आता कुटुंब वाढवायचे नाही, म्हणून आम्ही ओरल गर्भनिरोधक घेत आहोत, अशा परिस्थितीत कोरोनाची लसदेखील घ्यावी का?  या विषयातील दोन गोष्टी स्पष्टपणे समजून घेणे महत्वाचे आहे की, जर आपण लस घेतल्यानंतर आपण कुटुंबास पुढे नेण्याची योजना आखत असाल तर ती केवळ आपलेच नव्हे, तर जन्माला येणाऱ्या बाळाला देखील संसर्गापासून वाचवते.

दुसरे म्हणजे कुटुंब नियोजन गोळ्यांमध्ये अगदी कमी प्रमाणात स्टिरॉइड्स असतात, ज्याचा उपयोग गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या हार्मोन्सचे उत्पादन थांबवण्यासाठी केला जातो, परंतु या स्टिरॉइड्स हानिकारक नाहीत. नुकतीच सरकारने गर्भवती महिलांना ही लस मिळावी यासाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली असून, यामध्ये गर्भवती महिलांच्या लसीकरणाशी संबंधित सर्व शंका दूर करण्यात आल्या आहेत. सर्व उपलब्ध लस गर्भवती महिलांसाठी सुरक्षित असल्याचे आढळले आहे.

दोन डोसनंतरच कुटुंब नियोजन

तज्ज्ञांचे मत आहे की, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कुटुंब वाढवण्याबद्दल विचार केला पाहिजे. परंतु तरीही, जर आपणास नकळत एखाद्या डोसनंतर गर्भधारणा झाली असेल, तर घाबरून जाण्याची किंवा काळजी करण्याचे काही कारण नाही. आपण या परिस्थितीत नियोजित वेळी आणखी एक डोस घेऊ शकता. हे जन्मणाऱ्या बाळासाठी संसर्गाविरूद्ध संरक्षणात्मक ढाल तयार करण्यास देखील मदत करेल. जर, आपण जागरूक जोडपे आहात आणि कुटुंब वाढवण्याची योजना आखत असाल तर लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरच गर्भधारणेचा विचार करणे, उत्तम ठरेल. हे आई आणि बाळासाठी योग्य ठरेल.

(How safe is pregnancy between the first dose of corona vaccine and the second dose? Find out the opinion of experts)

हेही वाचा :

कल्याणसाठी आनंदाची बातमी, तालुक्यातील 46 पैकी 36 ग्रामपंचायती कोरोनामुक्त, शाळाही सुरू

घरात राहून व्हिटॅमिन डीची कमतरता कशी दूर कराल? जाणून घ्या याबद्दल सर्व काही

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.