How to avoid pregnancy: नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी हे आहेत ‘सात’ प्रभावी उपाय!
नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी, बाजारात अनेक प्रकारचे गर्भनिरोधक उपलब्ध आहेत. ज्यांच्या मदतीने लोक नको असलेली गर्भधारणा टाळू शकतात. परंतु, काही सोपे उपाय वापरूनही तुम्ही तुमचे आरोग्या सुरक्षीत ठेवून, गर्भधारणा टाळू शकता. जाणून घ्या, गर्भधारणा टाळण्यासाठी सात प्रभावी उपाय.
बहुतेक स्त्रिया नको असलेल्या गर्भधारणेबद्दल चिंतित (Concerned about pregnancy) असतात. अशा परिस्थितीत गर्भनिरोधक त्यांना खूप मदत करू शकतात. बहुतांश वेळा कळत-नकळत शारीरिक संबंध ठेवताना गर्भधारणा होण्याची भीती असते. खरं तर, करिअर, आरोग्य आणि इतर गोष्टींचा विचार करून, बऱ्याच स्त्रियांना लवकर गर्भधारणा करायची नसते. त्यासाठी योग्य नियोजन आणि वेळ-काळ ठरवूनच निर्णय घेतला जातो. विवाहित जोडप्यांसाठी सर्वात कठीण काळ असतो जेव्हा त्यांना कळते की, नको असलेली गर्भधारणा त्यांच्या आयुष्यात समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे, लैंगिक संबंधादरम्यान (During sex) गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्ही अनेक मार्ग अवलंबू शकता. यासाठी तुम्ही अनेक प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या आणि निरोध (prevention) वापरू शकता. याशिवाय, या विशेष अशा सात उपायांनी गर्भधारणा होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. अशा परिस्थितीत, महिलांनी योग्य गर्भनिरोधक निवडणे महत्वाचे आहे. परंतु ते वापरण्यापूर्वी, कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
1) विड्रॉल टेक्निक
गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्ही विड्रॉल टेक्निकचे तंत्र वापरु शकता. यामध्ये, पुरुष जोडीदार वीर्य स्खलन होण्यापूर्वी त्याचे लिंग महिला जोडीदाराच्या योनीतून बाहेर काढतो आणि त्याचे वीर्य बाहेर सोडतो. यामुळे शारीरिक संबंध असतानाही गर्भधारणेचा धोका कमी होतो. बहुतेक लोकांना या टेक्निकच्या मदतीने शारीरिक संबंध बनवायला आवडतात.
2)इंट्रायूटरिन डिव्हाईस
हे टी-आकाराचे उपकरण आहे जे गर्भधारणा टाळण्यासाठी वापरले जाते. प्लास्टिक आणि तांब्यापासून बनवलेले हे उपकरण महिलेच्या गर्भाशयात ठेवले जाते. याच्या वापरानंतर वंध्यत्व आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो असा अनेकांच्या मनात गैरसमज असला तरी या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. IUD काढून टाकल्यानंतर महिला सहजपणे गर्भवती होऊ शकतात.
3) इंट्रायूटरिन सिस्टम
हे एक लहान टी-आकाराचे गर्भनिरोधक उपकरण आहे, जे गर्भाशयाच्या आत ठेवलेले असते आणि ते शरीरातील प्रोजेस्टेरॉन हार्मोनला उत्तेजित करते. तुम्ही दीर्घकाळ IUS वापरू शकता. तसेच, ते काढून टाकल्यानंतरही, आपण सहजपणे गर्भधारणा करू शकता.
4) बर्थ कंट्रोल इम्प्लांट
गर्भधारणा टाळण्यासाठी हे देखील एक चांगले तंत्र आहे. यात माचिस काडीच्या आकाराची एक छोटी आणि पातळ रॉड असते, जी महिलांच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन हार्मोनचा एक प्रकार सोडण्यास मदत करते.
5) स्पंज
काही स्त्रिया गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक स्पंज देखील वापरतात. हे शुक्राणूनाशकाचे फोमसारखे स्वरूप आहे जे शुक्राणूंना गर्भाशयात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी योनीच्या आत ठेवले जाते. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते कधीही काढू शकता.
6) वजाइनल रिंग
गर्भनिरोधक म्हणून योनीतील रिंग देखील वापरल्या जातात. ही एक अतिशय मऊ आणि प्लास्टिकच्या अंगठी सारखी आहे, जी योनीमध्ये स्थापित केली जाते. हे स्त्रीच्या शरीरात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनसारखे हार्मोन्स सोडते. त्यामुळे हार्मोनल बॅलन्समुळे महिलांना गर्भधारणा होत नाही.
7). स्पर्मीसाइड टॅब्लेट(शुक्राणुनाशक गेाळ्या)
लैंगिक संभोग दरम्यान, जोडीदाराने शुक्राणूनाशक गोळी योनीमध्ये स्थापित केली तर ते अधिक चांगले संरक्षण देते. त्यामुळे गर्भधारणा होणे देखील सहज टाळता येते.