PCOS Cure : डॉक्टरांचा सल्ला ते डाएटिंग, PCOS पासून आयुष्यभराची मुक्ती; वाचा डॉक्टरांच्या टिप्स
‘पीसीओएस’ वर वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. मात्र, फिटनेस एक्स्पर्टच्या मते संतुलित आहार, जीवनशैलीत बदल (LIFESTYLE IMPACT) आणि पुरेशा व्यायाम यांच्या सहाय्याने पीसीओएस वर मात करणे शक्य आहे.
नवी दिल्ली : घर, मुलं अन् ऑफिसच्या रहाटगाड्यात अडकलेल्या महिलांना स्वत:च्या तब्येतीकडं लक्ष द्यायला पुरेशा वेळ मिळत नाही. जीवनशैलीत बदलाचा थेट फटका महिलांच्या आरोग्यावर जाणवतो आहे. महिलांना विविध विकारांना सामोरे जावं लागतं. आजकाल महिला मोठ्या प्रमाणात ‘पीसीओएस’च्या शिकार होत आहे. पीओसीएस म्हणजे ‘पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. सर्वसामान्य भाषेत PCOS म्हणून ओळखला जातो. पीसीओएस एक हार्मोनल समस्या (HARMONAL ISSUE) मानली जाते. प्रजननक्षम वयात महिलांच्या शरीरात पुरूष हार्मोनची पातळी (HORMONE LEVEL) वाढते. महिलांच्या गर्भधारणेवर मोठा परिणाम परिणाम जाणवतो. भविष्यात वंधत्वाच्या समस्येलाही तोंड दयावे लागू शकत. ‘पीसीओएस’ वर वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. मात्र, फिटनेस एक्स्पर्टच्या मते संतुलित आहार, जीवनशैलीत बदल (LIFESTYLE IMPACT) आणि पुरेशा व्यायाम यांच्या सहाय्याने पीसीओएस वर मात करणे शक्य ठरते.
प्लास्टिक टाळा:
‘पीसीओएस’ग्रस्त महिलांना प्लास्टिक हानिकारक ठरतं. प्लास्टिक कंटेनर्स बनविण्यासाठी BPA चा वापर केला जतो. शरीराचे हार्मोन्स असंतुलित करण्याची क्षमता बीपीएमध्ये असते. पीसीओएसग्रस्त महिलांच्या हार्मोन्समध्ये वेगाने बदल होतात. त्यामुळे बीपीएमुळं हार्मोन्सवर अधिक परिणाम जाणवू शकतो.
धुम्रपान व मद्यपान टाळा
तुम्ही पीसीओएसने त्रस्त असल्यास संतुलित जीवनशैलीचा अंगिकार करायला हवा. मद्यपान व धुम्रपान टाळण्याच्या कृतीचा देखील यामध्ये समावेश आहे. तुम्हाला मद्यपानाचे व्यसन असल्यास त्यातून तत्काळ बाहेर पडणं कठीण ठरतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्यसनातून मार्ग काढणं सुकर ठरतं.
व्यायाम करा
तज्ज्ञांच्या मते, एका जागेवर बसून काम करण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये पीसीओएसची समस्या अधिक असते. त्यामुळे शरीराची गतिशीलता अत्यंत महत्वाची ठरते. तुम्ही त्यासाठी योगसाधनेचा मार्ग अवलंबू शकतात. तसेच झुंबा, जॉगिंग यासारख्या व्यायाम प्रकारही निवडू शकतात. काही योग प्रकार देखील तुम्हाला उपयुक्त ठरू शकतील.
संतुलित आहार
पीसीओएसग्रस्त महिलांसाठी संतुलित आहाराची नेहमी शिफारस केली जाते. बाजारातील फास्टफूडपेक्षा घरातील जेवण सर्वोत्तम पर्याय ठरतो. प्रक्रियायुक्त आणि हवाबंद खाद्यपदार्थांचा वापर नेहमी टाळायलाच हवा.
शरीर डिटॉक्स करा
पहिल्यांदा सकाळी एक ग्लास गरम पाणी नियमित प्या. तुम्ही त्यामध्ये लिंबू देखील टाकू शकतात. तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्याबरोबरच उर्जेचा पुरवठा करण्यास देखील सहाय्यक ठरू शकतो.
संबंधित बातम्या
घसा खवखवण्याच्या समस्यांपासून या घरगुती उपायांनी आराम मिळवा
आता कोरोनाला संपवायचं असेल तर मास्क मुक्त होऊनच जगावं लागेल कारण…