उष्माघातापासून स्वतःचा बचाव ‘असा’ करा!

उष्णतेवर त्वरित उपचार न केल्यास ते प्राणघातकही ठरू शकते. अशा तऱ्हेने या उन्हाळ्यात काही गोष्टींची काळजी घेऊन उष्णतेची लाट टाळता येऊ शकते. उष्णतेची लाट टाळण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उष्माघातापासून स्वतःचा बचाव 'असा' करा!
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 3:15 PM

मुंबई: सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. उन्हामुळे लोकांची प्रचंड गैरसोय होतेय. उन्हामुळे लोक गंभीर आजारी पडू लागतात. उष्णतेवर त्वरित उपचार न केल्यास ते प्राणघातकही ठरू शकते. अशा तऱ्हेने या उन्हाळ्यात काही गोष्टींची काळजी घेऊन उष्णतेची लाट टाळता येऊ शकते. उष्णतेची लाट टाळण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उष्णतेची लाट टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

स्वत:ला हायड्रेटेड ठेवा-

उष्णता टाळायची असेल तर भरपूर पाणी प्या. कारण उन्हाळ्याच्या ऋतूत उन्हात चालल्याने खूप घाम येतो, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी यांचे सेवन करावे. त्याचबरोबर जर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

जास्त वेळ बाहेर राहू नका

काही लोकांना खूप बाहेर फिरण्याची सवय असते. परंतु उन्हाळ्याच्या हंगामात हे टाळले पाहिजे. कारण व्यर्थ बाहेर फिरण्यामुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे बाहेर जरी गेलात तरी स्वत:ला कॅप, ओढणी, रुमालाच्या मदतीने झाकून ठेवा. असे केल्याने तुम्ही उष्माघातापासून स्वत:चा बचाव करू शकता.

आरामदायी कपडे घाला

उन्हाळ्यात बाहेर गेल्यास आरामदायी कपडे घालावेत. कारण गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी हलके आणि सैल कपडे घाला.

चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?.
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?.
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही.