मुंबई : मजबूत हाडांसाठी निरोगी आहार (Healthy diet) घेणे खूप महत्वाचे आहे. निरोगी आहाराने तुमच्या हाडांना सर्व आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात. हाडे मजबूत होण्यासाठी पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. आपण आहारात कॅल्शियम (Calcium) समृद्ध असलेले कोणते पदार्थ समाविष्ट करू शकता ते जाणून घेऊया. कारण निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला कॅल्शियमची अत्यंत आवश्यकता असते. यामुळेच प्रत्येक व्यक्तीने आपल्या दररोजच्या आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी (Vitamin D) नक्कीच घ्यावे.
तुम्ही आहारात सोया उत्पादनांचा समावेश करू शकता. यात टोफू, सोया दूध आणि सोयाबीन इत्यादींचा समावेश आहे. या पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर असते. हे पदार्थ हाडे मजबूत करण्यास मदत करतात. याशिवाय ते आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे देतात. आपण सोयाबीनच्या भाजीचा देखील आहारात समावेश करू शकता.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर पोषक असतात. लेट्युस, पालक, कोबी, ब्रोकोली आणि फ्लॉवर या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. यातील कॅल्शियम हाडांच्या निर्मितीस मदत करते. त्यामुळे दात मजबूत होतात. इतकेच नाही तर आपण हा हिरव्या भाज्यांचे सूप देखील आहारात घेऊ शकता.
दुग्धजन्य पदार्थ हे प्रथिने आणि कॅल्शियमचे खूप चांगले स्त्रोत आहेत. यामध्ये दूध आणि दही सारख्या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. हे हाडे मजबूत होण्यास मदत करतात. चीजमध्ये कॅल्शियम भरपूर असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. आपण कॅल्शियम मिळवण्यासाठी आहारात ताकाचा देखील समावेश करू शकता.
अंड्यांमध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. हे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तुम्ही अनेक प्रकारे अंडी खाऊ शकता. ते खूप चवदार आणि निरोगी आहेत. ते आरोग्यासाठी इतर अनेक फायदे देखील देतात.