Extended Lab: भारतातील पहिली एक्स्टेन्डेड रिअॅलिटी लॅब सुरू, कॅन्सरवर होणार आधुनिक उपचार
हेल्थकेअर ग्लोबल एन्टरप्रायझेस लिमिटेडने (HCG) देशातील पहिली एक्स्टेन्डेड रिअॅलिटी लॅब (Extended Lab) एचसीजी कॅन्सर रुग्णालय, बंगळुरू (bengaluru) येथे सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.
बंगळुरू: हेल्थकेअर ग्लोबल एन्टरप्रायझेस लिमिटेडने (HCG) देशातील पहिली एक्स्टेन्डेड रिअॅलिटी लॅब (Extended Lab) एचसीजी कॅन्सर रुग्णालय, बंगळुरू (bengaluru) येथे सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. रुग्णांना अधिक चांगला अनुभव मिळावा म्हणून एचसीजी कॅन्सर रुग्णालयाने मायक्रोसॉफ्ट होललेन्स-2 चा वापर केलेली भारतातील पहिली एक्स्टेन्डेड रिअॅलिटी लॅब सुरू केली आहे. हे मिक्स्ड रिअॅलिटी तंत्रज्ञान आहे. हेल्थकेअर ग्लोबल एन्टरप्रायझेस लिमिटेड ही कर्करोग नियंत्रणावर काम करणारी देशातील सर्वात मोठी शृंखला आहे. होलोलेन्स तंत्रज्ञानामुळे कर्करोगावरील उपचारात क्रांतिकारी बदल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे श्रेणी – 2 शहरांतील डॉक्टरांना मेट्रो शहरांतील डॉक्टरांकडून अविरत मिळणाऱ्या मार्गदर्शनाखाली काम करता येईल, त्यामुळे एचसीजीमध्ये उपचार घेत असलेल्या प्रत्येक रुग्णाला वेगवान आणि त्या श्रेणीतील सर्वोत्तम उपचार मिळणे शक्य होणार आहे.
स्वतंत्रपणे काम करण्यास, आरोग्यसेवा करणाऱ्या पथकांस सक्षम करून होलोलेन्स – 2 रुग्णांच्या देखभालीचा कालावधीही कमी करतात. होलोलेन्स-2 सह वैद्यकीय तज्ज्ञ शल्यविशारदांशी, ते कुठेही असले तरी संपर्क साधू शकतात. शक्य असलेले सर्वोत्तम उपचार देण्यासाठी इमर्सिव्ह 3-D मंचावरून चर्चा करू शकतात. विंडोज, अँड्रॉईड किंवा आयओएस उपकरणांवर वापरता येणाऱ्या डायनॅमिक्स 365 रिमोट असिस्टचा वापर करून भारतातील श्रेणी – 2 आणि श्रेणी – 3 शहरांतील वैद्यकीय कौशल्य आणि बुद्धिमत्तेतील दरी बुजवण्यासाठी याचा वापर होणार आहे. ज्ञानाचे सामायिकीकरण, अनुकृत (सिम्युलेटेड) प्रशिक्षण आणि वैयक्तिकीकृत रुग्ण काळजी यांच्या माध्यमातून स्वास्थ्य देखभाल उद्योगात बदल घडवून आणण्यासाठी हे सहाय्यक ठरणार आहे.
आरोग्य क्षेत्रातील वरदानच
एचसीजीमध्ये मायक्रोसॉफ्ट होलोलेन्स – 2 चा स्वीकार करणे, हे स्वास्थ्य देखभालीच्या एका मोठ्या हेतूने उचलेलेले महत्त्वाचे पाऊल आहे. होलोलेन्स वापरकर्त्यांना त्यांच्या दृष्टिकोनातून प्रक्षेपित केलेल्या घटकांशी संवाद साधू देते. होलोलेन्समुळे युझर्स त्यांच्या व्ह्यूमध्ये प्रोजेक्ट करण्यात आलेल्या वस्तूंशी संवाद साधू शकतात, हे आरोग्य सेवाक्षेत्रातील सर्वांसाठीच एक वरदान आहे. वैद्यकीय परिस्थितीच्या समाकलनासाठी, शस्त्रक्रियेत सुधारणा किंवा रुग्णाच्या परिस्थितीचे मूल्यमापन करणे यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, असं हेल्थकेअर ग्लोबल एन्टरप्रायझेस लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. बी एस अजयकुमार यांनी सांगितलं.
आरोग्य सेवेतील नवे युग सुरू
एचसीजी हे कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यात अग्रणी आहे. भारतातील पहिल्या मायक्रोसॉफ्ट होलोलेन्स 2 चा वापर केलेल्या विस्तारित रिअॅलिटी लॅबच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहे. कर्करोगाच्या वैयक्तिकीकृत आणि अचूक उपचारांच्या माध्यमातून रुग्णांची स्थिती सुधारण्यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना मिळत असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. होलोलेन्स सारख्या वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाद्वारे आरोग्यसेवेतील एक नवीन युग सुरू केले जात आहे यात शंकाच नाही. आरोग्यसेवेचे भवितव्य हे मिश्र वास्तवात रुजलेले आहे आणि होलोलेन्स 2 या बदल्याचे केंद्रस्थानी असल्याचे वचन देते, असे हेल्थकेअर ग्लोबल एन्टरप्रायझेस लिमिटेडचे सीईओ राज गोरे म्हणाले.
जगात कुठेही असेल तरी व्हिडीओ कॉलवरून माहिती
निदानाचा वेग वाढविणे, उपचारांचा कालावधी कमी करणे आणि वैयक्तिक देखभाल करणे या माध्यमातून मिक्स्ड रिअॅलिटी सोल्यूशन्स वैद्यकीय व्यावसायिक व तज्ज्ञांना आरोग्यसेवा नव्या स्वरुपात प्रदान करण्यासाठी सक्षम करत आहे. लक्षावधी रुग्णांपर्यंत अत्याधुनिक कर्करोग देखभाल सेवा नेणाऱ्या एचसीजी रुग्णालयाशी जोडले गेल्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मिक्स्ड रिअॅलिटी प्रत्यक्षात आणून त्यातून एक उत्तम अनुभव प्राप्त होईल. मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स 365 रिमोट असिस्टचा वापर करून मायक्रोसॉफ्ट 2 होलोलेन्स परिधान करून डॉक्टर्स त्यांचे सहकारी किंवा तज्ज्ञांचा, ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असले तरी व्हिडीओ कॉल्स घेऊ शकतील. प्रत्यक्ष त्या वेळी त्यांना माहिती मिळेल. परिणामी माहिती मिळण्यात आणि कार्यक्षमतेत सुधारणा होईल,असे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, सुशीलकुमार श्रीधरन यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
Corona Vaccine : मोठी खूशखबर! कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सिन लसीचा डोस 225 रुपयांनी स्वस्त
Photo Gallery | फिटनेसमध्ये आलियाला टक्कर देतेय रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर-साहनी
Corona Vaccination: प्रीकॉशनरी डोससंदर्भात मोठी बातमी! 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना घेता येणार डोस, पण…