गरोदरपणात हेअर कलर करणे कितपत सुरक्षित ? जाणून घ्या संशोधन काय सांगतं ?

गरोदरपणात जेवणापासून ते रोजच्या दिनचर्येपर्यंत अनेक गोष्टींची नीट काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्याचबरोबर महिलांना या काळात रासायनिक गोष्टींपासून दूर राहण्यास सांगितले जाते. अशा परिस्थितीत गरोदर असताना केसांना कलर करावा की नाही , असा प्रश्न पडतो.

गरोदरपणात हेअर कलर करणे कितपत सुरक्षित ? जाणून घ्या संशोधन काय सांगतं ?
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 4:59 PM

नवी दिल्ली | 21 ऑगस्ट 2023 : गरोदरपणाचा (pregnancy) काळ प्रत्येक महिलेसाठी कास असतो. मात्र या काळात प्रत्येक गोष्टीबाबत विशेष काळजी घेणेही महत्वाचे असते. या काळात शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात, ज्यामुळे आपल्या शरीरासह मानसिक रित्याही काही बदल होतात. त्यामुळे त्यामुळे या काळात खाण्यापासून ते रोजच्या दिनचर्येपर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

गर्भधारणा झाल्यावर, काही पदार्थ खाणे, औषधे, अल्कोहोल, धूम्रपान यासारख्या गोष्टी टाळणे चांगले मानले जाते. आजकाल केसांना कलर करणं (hair color) खूप ट्रेंडमध्ये आहे. अशा परिस्थितीत गरोदर असताना केसांना कलर करावा की नाही , असा प्रश्न अनेकींना पडतो.

गरोदरपणात महिलांच्या दैनंदिन दिनचर्येतही बरेच बदल होतात. त्याच वेळी, आई आणि बाळाला कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी महिलांना काही गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. हेअर कलरमध्ये अनेक रसायने असतात, त्यामुळे गरोदरपणात त्यांचा वापर करावा की नाही ते जाणून घेणे महत्वाचे ठरते. याबाबत एक अभ्यास काय सांगतो, ते जाणून घेऊया.

गरोदरपणात हेअर कलर

हेअर कलर मध्ये अनेक प्रकारची रसायने वापरली जातात आणि या कारणास्तव, गर्भधारणेदरम्यान केसांना रंग द्यावा की नाही, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. याबाबत डॉक्टर सांगतात की, गरोदरपणात केसांना रंग लावणे सुरक्षित आहे की नाही याबद्दल फारशी माहिती नाही. परंतु हेअर डाईमध्ये असलेल्या रसायनांचा कमीत कमी , थोडा भाग तरी(किमान) भाग तुमच्या स्कॅल्पद्वारे तुमच्या शरीरात शोषला जातो.

खरंतर गरोदर असताना केस रंगवणे सुरक्षित आहे की नाही यावर फारसे संशोधन झालेले नाही. कारण गर्भधारणेदरम्यान कोणत्याही महिलेवर क्लिनिकल चाचण्या करता येऊ शकत नाहीत. तरीही, गर्भधारणेदरम्यान केस कलर करायचेच असतील , तर काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.

कधी करावा कलर ?

गरोदरपणात पहिले तीन महिने अतिशय महत्वाचे आणि नाजूक असतात. हा काळ गर्भातील गर्भाच्या वाढीचा आणि विकासाचा असतो. मेंदू आणि पाठीचा कणा यासारखे महत्त्वाचे अवयव पहिल्या तिमाहीत तयार होत आहेत. म्हणूनच या काळात नीट काळजी घेणे आणि सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्हाला केसांचा रंग करायचा असेल तर पहिले तीन महिने थांबावे.

या गोष्टींचीही घ्या काळजी

जर तुम्ही गरोदरपणात केसांना कलर करायचा विचार करत असाल तर हर्बल कलर वापरण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही चांगल्या हेअर स्टायलिस्टचा सल्लाही घेऊ शकता.

अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, तात्पुरत्या काळासाठी ( Semi-permanent) आणि कायमस्वरूपी (permanent) असणाऱ्या हेअर कलरमध्ये अधिक प्रमाणात रसायने असतात, त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. त्यामुळे गरोदरपणात हेअर कलर करायचा असेल तर टेम्पररी कलर करणे उत्तम ठरते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.