High Cholesterol: हाय कोलेस्ट्रॉल असताना बटाट्याचे सेवन करू शकतो का? जाणून घ्या बटाटा खाण्याची योग्य पद्धत आणि फायदे
हाय कोलेस्ट्रॉल असणाऱ्या व्यक्ती बहुतांश वेळा बटाटा खाण्याबद्दल साशंक असतात. तज्ञांच्या सांगण्यानुसार, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल तर बटाट्यासंदर्भात योग्य माहिती असणे गरजेचे आहे, त्यानंतर त्याचे सेवन करू शकता.
आजकालची व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य पद्धती आणि खराब दिनचर्या (bad lifestyle, food habits) यामुळे बहुतांश लोकांना जाडेपणाची (weight gain, obesity) समस्या भेडसावताना दिसते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, संपूर्ण जगात दर तिसरी व्यक्ती आजकाल कोलेस्ट्रॉलच्या (cholesterol) समस्येमुळे त्रस्त असते. कोलेस्ट्रॉल शरीरातील अनेक प्रक्रियांसाठी महत्वाचे असते. हा एक फॅट सबस्टान्स आहे, ज्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य प्रमाणात राहणे गरजेचे असते. त्यासाठी तुम्हाला रोजच्या दिनचर्येत योग्य, पौष्टिक आहार आणि शारीरिक व्यायामाचा (good food habits, exercise) समावेश केला पाहिजे. हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकारासारखी गंभीर आणि जीवघेणा आजार होण्याची शक्यता असते. हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्ती खाण्या-पिण्याच्या बाबतीत खूप कंजुशी करतात. काय खायचे याबाबतही ते बरेचदा साशंक दिसतात. हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्ती बटाटा खाऊ शकतात का, ते किती फायदेशीर ठरू शकते हे जाणून घेऊया.
हाय कोलेस्ट्रॉल असताना बटाटा खाऊ शकतो का ?
हेल्थलाइनच्या वृत्तानुसार, बटाटा हा केवळ स्वादिष्ट नसतो, तर त्यामध्ये इतर भाज्यांच्या तुलनेत पौष्टिक तत्वेही जास्त असतात. न्यूज 18 हिंदीने याबाबत वृत्त दिले आहे. बटाट्यामध्ये सॉल्युबल फायबरसह अनेक मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. सॉल्युबल फायबर्स हे अन्नपचन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी उपयुक्त असतात आणि पित्त आम्ल कमी करण्याचे काम करतात. पित्त ॲसिड हे कॉलेस्ट्रॉलशी संबंधित असते, जे कमी झाल्यास शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ज्या पदार्थांमध्ये सॉल्युबल फायबर असते, त्यांच्यामुळे उच्च रक्तदाब, बॅड कॉलेस्ट्रॉल आणि शरीरावर येणारी सूज, अशा समस्यांच्या लक्षणांपासून आराम मिळतो. बटाट्यामध्ये सॉल्युबल फायबर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते, त्यामुळे हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या व्यक्तीही कोणत्याही शंकेशिवाय बटाटा खाऊ शकतात. बटाट्याचे सेवन केल्यामुळे केवळ कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात रहात नाही तर शरीरालाही अनेक फायदे मिळतात.
कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी असे करावे बटाट्याचे सेवन –
- कोलेस्ट्रॉल असताना बटाटा तेव्हाच खाऊ शकता, जेव्हा तुम्ही त्याचे सेवन योग्य पद्धतीने कराल.
- बटाट्याच्या सालामध्ये सर्वात जास्त फायबर असते, त्यामुळे बटाटा त्याच्या सालासह सेवन करावा.
- बटाटा तेलात तळल्यामुळे त्यातील सर्व पोषक तत्व नष्ट होतात आणि तो हाय कोलेस्ट्रॉलसाठी कारणीभूत ठरतो. त्यामुळे बटाटा हा उकडून किंवा भाजून खावा.