AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा फॉलो, कोरोनापासून रहा सुरक्षीत

कोरोनची लाट ओसरत आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा देशभरात कोरोनाने (corona virus) डोके वर काढले आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव देखील झपाट्याने वाढत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीची विशेष काळजी घ्यावी लागते.

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा फॉलो, कोरोनापासून रहा सुरक्षीत
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 7:45 AM

Health Tips : कोरोनची लाट ओसरत आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा देशभरात कोरोनाने (corona virus) डोके वर काढले आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव देखील झपाट्याने वाढत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीची विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच आपण देखील या व्यक्तीच्या संपर्कात येणार नाहीत याची देखील दक्षता घ्यावी लागते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा अनेकांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे पहायला मिळाले. मात्र त्यानंतर वाढलेल्या लसीकरणाच्या (Vaccine)वेगामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास काय काळजी घ्यावी? हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

कमीत कमी संपर्क ठेवा : जर तुमच्या घरात कोणी कोरोबाधित रुग्ण असेल, तर त्याच्याशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घ्यावी. कोरोनाबाधित व्यक्तीशी सातत्याने संपर्क आल्यास तुम्हाला देखील कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी तुम्ही घरातील अशा व्यक्तीची निवड करा की तिची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल. त्याच व्यक्तीचा फक्त घरातील कोरोनाबाधित व्यक्तीशी संपर्क यावा. घरातील जे वृद्ध व्यक्ती आहेत, किंवा ज्या लोकांना विविध आजार आहेत अशा व्यक्तीला शक्यतो कोरोनाबाधित व्यक्तीपासून दूरच ठेवा, कारण अशा व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका असतो.

वेगळ्या खोलीची व्यवस्था : तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल आणि जर ती घरीच होम क्वॉरंटाईन असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था करा. कारण असे केल्यास तुमचा संबंधित व्यक्तीशी वारंवार संपर्क येणार नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका कमी होईल.

घरातील सर्व व्यक्तींनी मास्क घाला : मास्क हे कोरोनावरचे सर्वात प्रभावी साधन आहे. म्हणून घरातून बाहेर पडताना मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. जर तुमच्या घरात एखादा कोरोनाबाधित रुग्ण असेल तर तुम्ही घरी देखील मास्कचा वापर करा. यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा बसून, कोरोनापासून तुमचे संरक्षण होईल.

घरात शक्यतो बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश देऊ नका: कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे जोपर्यंत तुमच्या घरात कोरोनाचा रुग्ण आहे, तोपर्यंत बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नका. तसेच तुम्ही देखील शक्यतो बाहेर जाणे टाळा.

संबंधित बातम्या 

सर्दीपासून बचावासाठी घरीच बनवा स्वादिष्ट बेसनाचा हलवा, जाणून घ्या रेसीपी

लग्नानंतर मूल होत नाही? वंध्यत्व आलंय हे ओळखायचं तरी कसं? डॉक्टरांनी दिलेली उत्तरं जाणून घ्यायलाच हवी

लग्नानंतर मूल होत नाही? वंध्यत्व आलंय हे ओळखायचं तरी कसं? डॉक्टरांनी दिलेली उत्तरं जाणून घ्यायलाच हवी

भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक
भारताकडे आता रशियाची S-500 मिसाईल सिस्टीम, S-400 पेक्षा खतरनाक.
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.