Kidney Stone Foods: तुम्हाला ‘किडनी स्टोन’ ची समस्या असेल तर ‘या’ 5 पदार्थांपासून रहा लांब; आहारातील बदलांमुळे कीडनी स्टोनच्या वेदना होतील कमी!

किडनी स्टोन : किडनीच्या रुग्णांनी काही पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ खाल्ल्याने तुमची समस्या वाढू शकते. तुम्हाला किडनीच्या समस्येने ग्रासले असले तरीही तुम्ही काही पदार्थ खाऊ नका. अन्यथा तुम्हाला हा त्रास पुन्हा होऊ शकतो.

Kidney Stone Foods: तुम्हाला ‘किडनी स्टोन’ ची समस्या असेल तर ‘या’ 5 पदार्थांपासून रहा लांब; आहारातील बदलांमुळे कीडनी स्टोनच्या वेदना होतील कमी!
फक्त दारूच नाही तर ‘या’ गोष्टींनीही तुमचं लिव्हर होऊ शकते खराब
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 2:14 PM

मुंबईः किडनी स्टोनची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. याचे कारण म्हणजे आजचा खराब आहार आणि जीवनशैली. किडनी स्टोनच्या समस्येमुळे (Kidney stone problems) रुग्णाला एवढ्या तीव्र वेदना होतात की अनेकवेळा असह्य होऊन दुखणे आटोक्यात (The pain is under control) आणण्यासाठी इंजेक्शन्सही घ्यावी लागतात. जर तुम्हाला किडनीशी संबंधित समस्या असतील तर तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कारण काही खाद्य पदार्थ तुमची समस्या आणखी वाढवू शकतात. किडनीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत याबाबतची माहिती तुम्हाला असल्यास, ते पदार्थ तुम्ही खाने टाळू शकता. मूत्रपिंडाच्या रुग्णांनी अशी कोणतीही गोष्ट खाऊ नये ज्यामध्ये प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात.

दुग्धजन्य पदार्थांमध्ये (In dairy products) प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर त्यात कॅल्शियमही मुबलक प्रमाणात असते. असे पदार्थ खाल्याने, किडनी स्टोनची समस्या अधिक वाढते आणि वेदना होतात म्हणून असे पदार्थ खाने टाळले पाहीजे.

जास्त प्रोटीन असणारे पदार्थ

दुग्धजन्य पदार्थांचे जास्त सेवन केल्याने कीडनी स्टोनची तुमची समस्या वाढू शकते. याशिवाय मांस, अंडी, सोयाबीन आणि मासे इत्यादींचे अतिसेवन टाळावे.

या भाज्या खाऊ नका

ज्यांना स्टोनचा त्रास आहे आणि जे लोक स्टोनचे रुग्ण आहेत. अशांनी ठराविक भाज्या टाळल्या पाहिजेत. अशा लोकांनी टोमॅटो, पालक, वांगी, भेंडी इत्यादी खाणे टाळावे. त्यामुळे स्टोनच्या रुग्णांची समस्या वाढू शकते, त्याचप्रमाणे ज्यांना स्टोन झाला आहे, त्यांच्या किडनीमध्ये पुन्हा स्टोनचा त्रास होऊ शकतो.

जास्त मीठ खाने टाळा

तुम्हाला स्टोनची समस्या असो वा नसो, जास्त मीठ खाल्ल्याने तुमची समस्या दोन्ही परिस्थितींमध्ये वाढू शकते. खरं तर, मिठाच्या अतिसेवनामुळे, कॅल्शियम किंवा सोडियमचे स्फटिक मुतखड्याचे रूप घेऊ शकतात.

पॅक केलेले खाद्यपदार्थ

ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांना पॅक केलेले अन्न खाण्यास मनाई आहे. वास्तविक, सोडियम मोठ्या प्रमाणात पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये आढळते. यामुळे तुमच्या शरीरातील समस्या आणखी वाढू शकते.

खूप गोड खाणे टाळा

सहसा लोक मधुमेहाच्या रुग्णांना जास्त प्रमाणात गोड खाण्यास मनाई करतात, परंतु अन्नातील अतिरिक्त साखर आणि कृत्रिम साखर केवळ किडनी स्टोन वाढवत नाही तर किडनीशी संबंधित इतर सर्व समस्या देखील वाढवते. त्यामुळे थंड पेये, सोडा, फ्रूटी, मिठाई, कुकीज किंवा कृत्रिम साखर वापरणारी कोणतीही गोष्ट खाणे टाळा.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.