Crying Benefits: काय? रडण्याचेही असतात फायदे? जाणून व्हाल हैराण
रडण्याचेही काही फायदे असतात. आम्ही तुम्हाला अधूनमधून रडण्याचे फायदे सांगणार आहोत, जे तुम्हाला लगेच जाणवू शकतील. पुढल्या वेळेस कधी रडू आलं तर याकडे नक्की लक्ष द्या.
नवी दिल्ली: आपण आतापर्यंत हसण्याच्या फायद्यांबद्दल वाचले किंवा ऐकले असेल. पण रडण्याचेही (crying) अनेक फायदे (benefits) असतात, हे तुम्हाला माहीत आहे का? रडणे हे कमकुवत पणाचे लक्षण आहे, असे बहुतांश लोकांना वाटतं, मात्र खरं सांगायच तर हे भावना (emotions) व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. कधीकधी रडण्याचे काही फायदेही होतात, त्याबद्दल जाणून घेऊया.
काही वेळ रडल्यानंतर जर थोडा वेळ झोपायची संधी मिळाली तर ते अजूनच उत्तम ठरते. रडल्यानंतर जर तुम्ही झोपलात आणि झोप झाल्यावर उठलात की रोजच्या दैनंदिन कामात व्यग्र झाल्यावर की तुम्हाला नवी उर्जा मिळते.
रडल्यामुळे भावनिक ओझं कमी होतं. तुमच्या मनात साठलेले विचार मोकळे होतात आणि डोक्यावरील ओझं कमी झाल्याने हलकं वाटतं. काही संशोधनात असं आढळलं आहे की रडल्यामुळे पॅरा-सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम (PNS) ॲक्टिव्हेट होते. ही PNS तुमच्या शरीराला आराम देते आणि पचनातही मदत करते.
जेव्हा तुम्ही खूप थकलेले असता, विशेषत: जेव्हा मानसिक थकवा आणि ताणामुळे त्रासलेले असता, अशा स्थितीत एखादी छोटीशी गोष्टही तुमच्या मनाला लागू शकते. आणि आपल्याला रडू येतं. पण तेव्हा जर तुम्ही रडलात, तर अर्ध्या-एक तासाने तुम्हाला मोकळं वाटू लागेल आणि तुमचं मनही शांत होईल.
रडल्याने आपलं मन हलकं होतं, ही खरी गोष्ट आहे. डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं. नवी उर्जा मिळाल्यासारखी वाटते, तसेच आपल्या विचारांमध्ये अधिक स्पष्टताही येते. त्यामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता उत्तम होते.