Drinking Hot Water Side Effects: तुम्हीपण एवढं गरम पाणी पिता का ? शरीरातील अवयवांचे होऊ शकते नुकसान
पाणी हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, पण गरम पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. प्रमाणापेक्षा जास्त गरम पाणी पिणे आपल्या शरीरासाठी विषासमान ठरू शकते.
नवी दिल्ली – पाणी हे जीवन (water) आहे. सर्व व्यक्तींनाच दिवसभरात पुरेसं पाणी प्यायचा सल्ला दिला जातो. थंडीच्या दिवसात जास्त तहान न लागल्याने पुरेसे पाणी प्यायले जात नाही. म्हणून काही लोकं गरम पाण्याचे (hot water) सेवन करतात. थंडीत गरम पाणी प्यायल्याने गळा, नाक आणि छातीला शेकही मिळतो. पण या गरम पाण्याचे सेवन आरोग्यासाठी हानिकारकही (Drinking Hot Water Side Effects)ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? आता तुम्ही विचार करत असाल की गरम पाण्याने काय नुकसान होणार?
पण प्रमाणापेक्षा अधिक गरम आणि एका पातळीपेक्षा अधिक पाण्याचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी विषासमान ठरू शकते. एका अहवालानुसार, यामुळे आपल्या शरीराच्या अंतर्गत अवयवांना खूप नुकसान होते. गरम पाणी पिण्यामुळे होणारे तोटे आणि त्याचे सेवन कसे करावे याबद्दल अधिक जाणून घेऊया.
स्किन टिश्यू होतात डॅमेज
जर आपण जास्त गरम पाण्याचे सेवन केले तर स्किन टिश्यूजना (त्वचेच्या ऊती) नुकसान सहन करावे लागू शकते. तज्ज्ञांच्या मते, यामुळे त्वचेचे अंतर्गत अवयव जळू शकतात. एका 60 वर्षाच्या माणसाने खूप गरम पाणी प्यायले आणि त्यामुळे त्याची श्वासोच्छवासाची यंत्रणा बंद पडली. त्यामुळे जास्त गरम पाणी पिणे धोकादायक ठरू शकते.
पाण्याचा स्त्रोत
पाणी गरम केल्यास ते धातूच्या कणांच्या संपर्कात येते. हे कण गरम पाण्यात लवकर विरघळतात. त्यामुळे तुमचा पाणीपुरवठा तपासत रहा. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, गरम पाणी प्यायचे असेल तर ते पाणी नेहमी स्टीलच्या भांड्यात गरम करून प्यावे.
पाणी गरम करताना घ्या या गोष्टींची काळजी
– पिण्याचे पाणी खूप जास्त उकळू नका. कारण एवढे गरम पाणी पिताना तुमचं तोंड किंवा जीभ भाजू शकते.
– जास्त गरम पाणी पिता येत नसेल तर आपण त्यात थोडं गार पाणी घालतो, पण तेही नुकसानदायक आहे. त्यामुळे पाणी एवढंच गरम करावं, ज्यायोगे ते आपल्याला नीट पिता येईल.
– पाणी जर जास्त गरम झालंच तर ते कोमट व्हायची वाट बघा. एकदम गरम पाणी पिणे धोकादायक ठरू शकते.