जंक फूडसह आवडीने खाता मेयॉनीज ? पण त्याचे हे दुष्परिणाम माहीत आहेत का ?

अतिशय आवडीने खाल्ले जाणारे मेयॉनीज हे आपल्या शरीरसाठी आरोग्यदायी आहे की नाही, याचा तुम्ही कधी विचार केला हे का ? रिपोर्ट्सनुसार, मेयॉनीजच्या अतिसेवनामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

जंक फूडसह आवडीने खाता मेयॉनीज ? पण त्याचे हे दुष्परिणाम माहीत आहेत का ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 9:02 AM

नवी दिल्ली : आजकाल बऱ्याच लोकांचे जंक फूड (junk food) खाण्याचे प्रमाण वाढले आहे. पिझ्झा, बर्गर, सँडविच, फ्रेंच फ्राईज असे अनेक पदार्थ तरूण पिढी खात असते. त्याची चव वाढवण्यासाठी एक घटक नेहमी त्यासोबत असतो, तो म्हणजे मेयॉनीज (Mayonnaise). लहानांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच ते आवडते. एवढेच नव्हे तर पास्ता, मोमोज यासोबतही मेयॉनीज खात त्याचा आनंद घेतला जातो. नाहीतर या पदार्थांची चव कमी झाल्यासारखी वाटते. अतिशय क्रिमी टेक्श्चर (creamy texture) असलेले हे मेयॉनीज तेल, अंड्यातील पिवळा बलक, व्हिनेगर, मीठ आणि मसाले यांच्यापासून तयार केले जाते.

मात्र आजकाल सर्व पदार्थांसोबत अतिशय आवडीने खाल्ले जाणारे मेयॉनीज हे आपल्या शरीरसाठी आरोग्यदायी आहे की नाही, याबद्दल तुम्ही कधी विचार केला हे का ? रिपोर्ट्सनुसार, मेयॉनीजच्या अतिसेवनामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याचे काय तोटे आहेत ते जाणून घेऊया..

ब्लड शुगरच्या रुग्णांनी मेयॉनीजपासून रहावे दूर

हे सुद्धा वाचा

आपल्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी अनेकदा बिघडते, त्यामुळे मेयॉनीज असलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. काही मधुमेही रुग्ण मोमोज किंवा बर्गर सोबत मेयॉनीज खूप आवडीने खातात, पण त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. मात्र ही एक मोठी चूक ठरू शकते व त्यामुळे आरोग्याच्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

वजन वाढण्याचा असतो धोका

आजकाल केवळ प्रौढ व्यक्तींमध्येच नव्हे तर लहान मुलांचे वजन वाढण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. विशेषत: 5 ते 11 या वयोगटातील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्याचे मुख्य कारण आहे, जंक फूडचे अतिसेवन. मुलांना हा प्रकार खायला खूप आवडतो आणि कोणत्याही खाद्यपदार्थात मेयॉनीज वापरल्यास ते मुलांचे अधिकच आवडते बनते. मुले जेवणात खूप चविष्ट असलेले मेयॉनीज खातात व त्यामुळे ते हळूहळू लठ्ठ होऊ लागतात.

हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास उद्भवू शकतो

जर एखाद्या लहान मुलाला अथवा प्रौढ व्यक्तीला मेयॉनीज खाण्याची सवय लागली तर काही दिवसांनी त्यांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या सतावू शकते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, त्यामध्ये असलेली चरबी शिरांमध्ये जमा होते आणि त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवते. यामुळे हळूहळू, हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळेच मेयॉनीज सेवन न करणे किंवा तो अतिशय कमी प्रमाणात खाणे हेच आरोग्याच्या दृष्टीने उत्तम ठरते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.