Video : ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यास घाबरु नका, घरच्या घरी 1 मिनिटात हा उपाय करा
विशेष प्रकारे श्वासोच्छवास घेतल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते असा दावा करण्यात आलाय. श्वसनाच्या या पद्धतीला प्रोनिंग (Proning) असं म्हटलं आहे.
नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूच्या (Corona Virus) दुसरी लाटेने थैमान घातलंय. परिस्थिती इतकी बिघडली आहे की स्मशानभूमीतही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला नंबर लागले आहेत. त्यात अनेक रुग्णांलयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता पडत आहे. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयांमधील स्थिती याबाबत सारखीच झालीय. त्यामुळेच प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणं अत्यावश्यक झालंय. अशातच सध्या सोशल मीडियावर कोरोनावरील घरगुती उपाय म्हणून अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ ज्यात विशेष प्रकारे श्वासोच्छवास घेतल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते असा दावा करण्यात आलाय. श्वसनाच्या या पद्धतीला प्रोनिंग (Proning) असं म्हटलं आहे (Know all about Proning breathing to increase oxygen and saturation of body amid corona).
सोशल मीडियावर शेअर होणारा किंवा व्हायरल होऊन नागरिकांपर्यंत पोहचणारा प्रत्येक व्हिडीओ किंवा माहिती खरीच असेल असंही नाही. अनेकदा अवैज्ञानिक आणि अतिशयोक्ती दावे करणारी माहिती पसरवली जाते. त्यामुळे वाचकांची दिशाभूल होण्याचाही धोका असतो. या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही. म्हणूनच या माहितीची खातरजमा करुन घेणं अत्यावश्यक असतं. त्यामुळेच श्वसनाशी संबंधित या व्हिडीओचीही सत्यता तपासणं गरजेचं आहे.
VIDEO: कोरोनाच्या काळात श्वसनाची ही पद्धत अगदी आरोग्य मंत्रालयानेही सुचवलीय…#Proning #Corona #Covid19 pic.twitter.com/zWTrvkoC4q
— Pravin Sindhu (@PravinSindhu) April 24, 2021
प्रोनिंग पद्धतीने श्वास घेण्यास सांगणाऱ्या या व्हिडीओत दावा करण्यात आला आहे की तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झालेली असली तरी विशिष्ट प्रकारे प्रोनिंग पद्धतीने श्वासोच्छवास घेतल्यास फायदा होता. शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. आपला दावा सिद्ध करण्यासाठी या व्हिडीओतील व्यक्तीने आपल्या बोटावर ऑक्सिमीटर लावून शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणात होणारा बदल दाखवला आहे. तसेच केवळ 1 मिनिटं प्रोनिंग पद्धतीने श्वास घेतल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी 93 टक्क्यावरुन 99 टक्क्यांपर्यंत वाढते असं म्हटलं आहे.
प्रोनिंग पद्धतीप्रमाणे ऑक्सिजनची पातळी कशी वाढवावी?
प्रोनिंगच्या या व्हिडीओत सांगण्यात आलंय की शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यासाठी संबंधित व्यक्तीने पोटावर झोपावं. पोटावर झोपताना पायांखाली आणि मानेखाली उशी घ्यावी. यानंतर दीर्घ आणि खोलवर श्वास घेऊन सोडावा. असं 1 मिनिटे केलं तरी शरीरातील ऑक्सिजन पातळी 99 टक्क्यांपर्यंत वाढते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही प्रोनिंगची शिफारस
विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील प्रोनिंक पद्धतीने खोलवर श्वास घेत शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्याची शिफारस केलीय. मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत ट्विट करुन नागरिकांना माहिती देण्यात आलीय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच पसंत केला जातोय. लोक हा व्हिडीओ केवळ शेअर करत नाहीत तर प्रतिक्रियाही देत आहेत. या प्रतिक्रियांमध्ये अनेकजण त्यांना या प्रोनिंगचा कसा फायदा झाला याचे अनुभव सांगत आहेत.
आरोग्य मंत्रालयाचे ट्विट-
Proning as an aid to help you breathe better during #COVID19 pic.twitter.com/FCr59v1AST
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) April 22, 2021
हेही वाचा :
महामारीचं भयान वास्तव, ऑक्सिजन बेड मिळेना, पत्नीकडून रिक्षात पतीला तोंडातून ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न, आख्खा देश हळहळला
राज्यात दिवसभरात तब्बल 676 रुग्णांचा मृत्यू, 67 हजार 160 नवे कोरोनाबाधित
व्हिडीओ पाहा :
Know all about Proning breathing to increase oxygen and saturation of body amid corona