मुंबई : प्रत्येकजण वाढते वजन कमी करण्यासाठी विविध उपायांचा अवलंब करतात. वजन वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. लठ्ठपणा अनेक प्रकारचे रोग वाढविण्याचे कार्य करते. पोटाची चरबी वाढल्याने अनेक समस्या उद्भवतात. परंतु आपल्याला माहित आहे का? की पोटावरची चरबी वेगवेगळ्या प्रकारची असते. (know how many type of belly fat and way to overcome it)
स्ट्रेस बेली
स्ट्रेस बेली तणावामुळे होते. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात कोर्टिसॉल हार्मोनची वाढ. जेव्हा आपल्याला जास्त ताणतणावाचा सामना करावा लागतो. तेव्हा शरीर जास्त प्रमाणात चरबी तयार करते. ज्यामुळे अनेकांच्या पोटावर चरबी जमा होते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी योग आणि ध्यान करा. दररोज असे केल्याने तणाव आणि नैराश्यातून मुक्त होण्यास मदत होते.
हार्मोनल बेली
हार्मोनल बेली हा हार्मोनल असंतुलनाचा परिणाम आहे. हायपोथायरॉईडीझमपासून पीसीओएस पर्यंत शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यामुळे पोटाची चरबी वाढते. हार्मोनल चरबी कमी करण्यासाठी, हार्मोन्स नियंत्रित करण्यासाठी जीवनशैलीत बदल करा. आहारात पाैष्टीक गोष्टी खा. अॅव्होकाडो, शेंगदाणे आणि मासे खा. वजन कमी करण्यासाठी व्यायामही करा.
लो बेली
जर एखाद्या मानसाचे शरीर जास्त जाड आहे आणि पोट कमी आहे. त्याला लो बेली असे म्हणतात. याचे प्रमुख कारण म्हणजे खराब जीवनशैली आहे. अशा व्यक्तीस बहुधा पोटा संबंधित समस्या असतात. यासाठी जास्त फायबरयुक्त पदार्थ खा. जास्त प्रमाणात पाणी प्या. या व्यतिरिक्त आहारात हिरव्या भाज्या खा. उष्मांक कमी करण्यासाठी कोअर व्यायाम करा.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!
Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!https://t.co/Znr5WfzLhp#Winter #diet #Food #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
(know how many type of belly fat and way to overcome it)