AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहुतांश महिलांना माहित नाही, त्यांच्या clitoris या संवेदनशील आणि आनंद देणाऱ्या अवयवाविषयी

महिलांच्या शरीराशी निगडीत अशा काही बाबी असतात, ज्याबद्दल खुद्द महिलांनाच माहीत नसते.

बहुतांश महिलांना माहित नाही, त्यांच्या clitoris या संवेदनशील आणि आनंद देणाऱ्या अवयवाविषयी
Image Credit source: Freepik
| Updated on: Jan 21, 2023 | 9:31 AM
Share

नवी दिल्ली – जेव्हा जेव्हा महिलांबद्दल चर्चा होते तेव्हा त्यांच्या शरीराच्या अनेक भागांकडे (women body) दुर्लक्ष केले जाते. त्यांना सर्दी, खोकला, ताप, एखादी सिस्ट किंवा कॅन्सर असा कोणताही गंभीर आजार असेल तर त्यांची नीट काळजी घेतली जाईल, मात्र प्रायव्हेट पार्टशी (private parts of body) संबंधित काही समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले जाते. महिलांना कितीही चिंता आणि समस्या असल्या, तरी त्याबद्दल त्या उघडपणे बोलू शकत नाहीत. याच कारणामुळे त्यांना त्यांच्या शरीरातील अवयवांशी (women helath) संबंधित काही गोष्टींची माहितीही नसते.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, महिलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल (पुरेशी) माहिती नसते. बहुतांश महिला या क्लिटॉरिस (Clitoris) अर्थात भगांकुरबद्दल काहीही माहीत नसते. अनेक महिलांना तर आपल्या शरीराच्या कोणत्या भागाबद्दल हेही समजत नाही, असंही डॉक्टरांनी सांगितले. क्लिटॉरिस बद्दल काही महत्वापूर्ण फॅक्ट्स जाणून घेऊया.

पुस्तकांमध्ये कधी आला क्लिटॉरिसचा उल्लेख ?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, क्लिटॉरिस हा असा अवयव आहे, ज्याबद्दल क्वचितच बोलले जाते. आणि बऱ्याच कालावधीपासून लोकांना त्याची माहिती देखील नव्हती. 1486 पासून मजकुराच्या रूपात याबद्दलचे संकेत दिले जात असले तरी, 1998 मध्येच डॉ. हेलन ओ’कॉनेल यांनी याचा शोध लावला. विचित्र बाब म्हणजे, अशी आहे की आजही एनाटॉमीच्या म्हणजेच शरीरशास्त्राच्या पुस्तकांमध्ये त्याचा आकार आणि लांबी याचा अचूक डायग्राम अथवा आकृतीही नसते.

क्लिटॉरिसशी संबंधित काही फॅक्ट्स –

मटाराच्या दाण्याइतका आकार

शरीरातील या अवयवाचा आकार बाहेरून मटाराच्या दाण्यासारखा दिसतो. हे यूरेथ्रावर (जेथून लघवी केली जाते) असलेल्या त्वचेच्या लहान तुकड्यासारखे दिसते. एखाद्या महिलेला तिच्या शरीराच्या रचनेबद्दल काळजीपूर्वक माहिती नसेल तर त्यांना याबद्दल शोधणे अवघड ठरू शकते.

महिलांच्या आनंदासाठी

बहुतेक लोक याचा (क्लिटॉरिसचा) अर्थ चुकीचा लावतात, कारण टीव्ही आणि चित्रपटांमध्ये महिलांच्या ऑर्गॅजमबद्दल एक वेगळीच प्रतिमा दर्शवली जाते. 75% ते 95% महिलांची शरीर रचना अशी असते की त्यांना केवळ क्लिटॉरिसमुळे आनंद मिळतो. म्हणून ज्या महिलांना असं वाटतं की त्यांच्यात काही चूक अथवा गडबड आहे किंवा ज्यांना शारीरिक संबंधानंतर काहीच वाटत नाही, ती त्यांची चूक नसते. हे पूर्णत: नॉर्मल आहे.

पुरूषांच्या जननेंद्रियासारखी रचना

क्लिटॉरिसची रचना ही पुरूषांच्या जननेंद्रियासारखीच असते. जसे पुरूषांमध्ये जननेंद्रिय असते तसे महिलांमध्ये हे क्लिटॉरिस असते.

मोठा आकार

येथे आपण महिलांच्या शरीररचनेबद्दल देखील बोलत आहोत. बहुतेक स्त्रियांना वाटते की शरीराच्या बाह्यभागावर जे दिसते ते योग्य आहे, परंतु, क्लिटॉरिसचा आकार बाह्य संरचनेपेक्षा सुमारे 10 पट मोठा असतो. बहुतांश भाग हा त्वचेच्या आत लपलेला असतो. त्याचा आकार 7 ते 12 सेंटीमीटर पर्यंत असू शकतो.

अतिशय संवेदनशील

पुरुषांचे जननेंद्रिय खूप संवेदनशील असते, परंतु क्लिटॉरिस हे अधिक नाजूक असते. त्यामध्ये 8000 पेक्षा जास्त नसा असतात, जे पुरुषांच्या जननेंद्रियापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.