Ginger: हृदय रोगापासून वाचवतं आलं, जाणून घ्या त्याचे अगणित फायदे !

किसलेलं किंवा बारीक चिरलेलं आलं हे लिंबाच्या रसामध्ये मिसळून किंवा चहामध्ये आलं घालून प्यायल्याने छातीत जमा झालेला कफ सहजपणे बाहेर पडू शकतो. त्याशिवाय आलं सेवन करण्याचे अगणित फायदे आहेत.

Ginger: हृदय रोगापासून वाचवतं आलं, जाणून घ्या त्याचे अगणित फायदे !
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 4:43 PM

आल्यामध्ये अनेक (Ginger) गुणधर्म आहेत. ते औषधीही आहे. आलं हे असा एक आयुर्वेदिक पदार्थ आहे, ज्याचा उपयोग मळमळ, उलटी, स्नायूंमधील वेदना, श्वास घेण्यास होणारा त्रास, हृदय रोग, लठ्ठपणा, कर्करोग (कॅन्सर) यांसारखे आजार मुळापासून (health problems) नष्ट करण्यासाठी केला जातो. आलं ताजं असताना त्याचा उपयोग करता येतोच. किसलेलं किंवा बारीक चिरलेलं आलं हे लिंबाच्या रसामध्ये मिसळून किंवा चहामध्ये आलं (Ginger Tea) घालून प्यायल्याने छातीत जमा झालेला कफ सहजपणे बाहेर पडू शकतो.

त्याशिवाय आलं वाळवून, त्याची पावडर करून किंवा त्याचा रस काढूनही त्याचे सेवन करता येते. आल्याचे सेवन केल्याने आपले शरीर व आरोग्याला अगणित फायदे (benefits of eating ginger) मिळतात. ते कोणते हे जाणून घेऊया..

स्मरणशक्ती वाढते –

आल्याचे नियमितपणे सेवन केल्यास मानसिक शक्ती मध्ये वाढते. आल्यामध्ये असलेले व्हिटॅमिन्समुळे स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. आणि अल्झायमर, पार्किन्सन यासारख्या न्यूरोडिजेनरेटिव्ह आजारांपासूनही आराम मिळतो.

स्नायूंच्या दुखण्यांपासून आराम –

आल्यामध्ये शक्तीशाली बायोॲक्टिव्ह कंपाऊंड जिंजरोल हे असते, ज्यामध्ये व्होलेटाइल मुबलक प्रमाणात असते. तुमच्या दैनंदिन आहारात आल्याचा वापर केल्याने व्यायामामुळे स्नायू दुखत असतील तर त्यापासून आराम मिळतो. तसेच क्रॅम्प्स, मायग्रेनचे दुखणेही कमी होते.

हृदय रोगापासून ठेवते सुरक्षित –

आल्यामध्ये रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याची तसेच रक्तातील साखरेची पातळी ( ब्लड शुगर लेव्हल) आणि कोलेस्ट्ऱॉल कमी करण्याची, नियंत्रणात ठेवण्याची क्षमता असते. तुम्ही तुमच्या आहारात आल्याचे नियमितपणे समावेश केल्यास हृदय रोग, हृदयविकाराचा झटका येणे आणि स्ट्रोक यासारखे गंभीर आजार दूर ठेवता येतील.

पचन सुधारते –

आलं खाल्याने किंवा त्याचे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सेवन केल्याने आपल्या पचनात सुधारणा होते. ज्यांना पोट दुखण्याचा किंवा पोट खराब होण्याचा त्रास असेल त्यांनी आल्याचा चहा घ्यावा, तसेच थोडं कच्चं आलंही खावं. आलं, गॅस्ट्रिक डिसफंक्शन आणि पोटदुखी सारख्या समस्यांपासून मुक्त करते आणि पचन सुधारते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.