चुप तुम रहो… चुप हम रहे ! शांत राहण्याचे आहेत अनेक शारीरिक व मानसिक फायदे , तुम्ही किती वेळ शांत बसता ?
Benefit of Silence : शांत किंवा गप्प राहण्यामुळे शारीरिक आणि मानसिक फायदे देखील होतात, हे तुम्हाला माहीत आहे का ? तज्ञांचा असा विश्वास आहे की शांत राहण्यामुळे व्यक्ती अधिक सजग आणि उत्पादक बनते.
नवी दिल्ली : सर्वत्र गोंगाट आणि धावपळ सुरू असताना, शांत जागा (silent place) मिळणं हे एक वेगळं सुख असतं. शांत राहून किंवा गप्प बसून एकमेकांच्या भावना समजून घेणे हा सर्वात सुंदर संवाद आहे, असं तुम्ही अनेक कवितांमध्ये वाचले असेल. पण शांत किंवा गप्प राहण्यामुळे शारीरिक आणि मानसिक फायदे (physically and mentally fit) देखील होतात, हे तुम्हाला माहीत आहे का ? तज्ञांचा असा विश्वास आहे की शांत राहण्यामुळे व्यक्ती अधिक सजग आणि उत्पादक बनते. यामुळे त्या व्यक्तींचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य (health)सुधारू शकते.
मौन राखण्याचे महत्व
आज आपण ज्या युगात राहतो त्या युगात तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जे लोक एकांताच्या शोधात असतात ते लोक या तंत्रज्ञानामध्ये हरवलेले दिसतात. परंतु शांतता जोपासण्याची पहिली पायरी म्हणजे आपले मानसिक आरोग्य सर्वांपेक्षा समजून घेणे आणि नंतर अशा तंत्रांचा समावेश करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे जे तुम्हाला शांततेची भावनिक उदारता आणि सामर्थ्य अनुभवू देतात.
कारचा कर्णकर्क्कश हॉर्न वाजवण्यापासून ते अतिपरिचित संगीत, मागणीनुसार शो आणि लोकांच्या गप्पा, तुमच्या इमारतीवरून उडणाऱ्या विमानाच्या आवाजापर्यंत, आजूबाजूला प्रचंड आवाज आहे. यामध्ये इतरांचा काय कधीकधी तुम्हाला तुमचा स्वतःचा आवाजही ऐकू येत नाही. तुमचा आतला, मनाचा आवाज ऐकून तुमच्या आयुष्यातील अर्ध्या समस्या सोडवता येतात, तोही आवाज ऐकता येत नाही. वैज्ञानिक पुराव्यांनुसार, ही आपल्या आरोग्यासाठी फारशी चांगली गोष्ट नाही.
तज्ञ आणि संशोधन अभ्यास सारखेच पुष्टी करतात की, विशेषत: या गोंगाटाच्या जगात, मौनात घालवलेला थोडासा वेळही आरोग्याला अनेक फायदे देऊ शकतो. शांत राहण्याचे मानसिक आणि शारीरिक असे अनेक सकारात्मक परिणाम होतात. ते कोणते हे जाणून घेऊया..
– रक्तदाब कमी होऊ शकतो.
– एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढू शकते.
– त्रासदायक विचार शांत करू शकता
– मेंदूच्या विकासास चालना मिळू शकते
– कोर्टिसोल कमी करू शकतो
– आतील रचनात्मकतेला चालना मिळते
– चांगली झोप येण्यास प्रोत्साहन मिळते.
– मन व मेंदू दोन्ही शांत राहू शकतो
मात्र, इथे गप्प बसणे म्हणजे संकटातही गप्प बसणे नव्हे. त्यापेक्षा कोणत्याही अनावश्यक आवाजापासून दूर राहा आणि ध्वनी प्रदूषण टाळा. शांत राहून किंवा मौन राखून हळूहळू, खोल श्वास घेतल्याने आणखी फायदे मिळू शकतात.