उष्माघाताच्या या लक्षणांकडे थकवा समजून दुर्लक्ष करू नका, अशी करा रिकव्हरी

अनेकदा लोक उष्माघाताला थकवा समजून दुर्लक्ष करतात. त्यांत काही लक्षणे दिसतात, परंतु ही एक सामान्य समस्या मानून ते सोडून देतात आणि गंभीर परिस्थिती उद्भवते.

उष्माघाताच्या या लक्षणांकडे थकवा समजून दुर्लक्ष करू नका, अशी करा रिकव्हरी
Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 4:50 PM

नवी दिल्ली : भारतात उन्हाळ्याचा (heat) कडाका जोरात असून येत्या काळात हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात एवढी उष्णता असते की अनेक राज्यांतील तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. उष्ण वारे आणि कडक सूर्यप्रकाशामुळे (heat wave) लोकांनी घराबाहेर पडणेही बंद केले आहे. कारण या काळात डिहायड्रेशन (dehydration) , त्वचेची जळजळ आणि जास्त घाम येणे अशा समस्या आपल्याला सतावतात. जसजशी उष्णता वाढेल तसतसा भारतात उष्माघाताचा धोकाही वाढणार आहे. उष्माघातानंतर उलट्या, मळमळ किंवा अतिसार असा त्रासही होतो.

अनेकदा लोक उष्माघाताला थकवा समजून दुर्लक्ष करतात. त्यांना काही लक्षणे दिसतात, परंतु ही एक सामान्य समस्या मानून ते सोडून देतात आणि गंभीर परिस्थिती उद्भवल्यावर रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते.

उष्माघाताची 4 लक्षणे जाणून घ्या आणि त्यातून बरे कसे व्हावे हेही समजून घेऊया.

उष्माघाताची लक्षणे

स्किनवर येतात रॅशेस

तुम्हाला माहिती आहे का, जर त्वचेवर जळजळ, खाज किंवा पुरळ उठत असेल तर हे देखील उष्माघाताचे लक्षण आहे. त्वचेवर उष्णतेमुळे पुरळ येणे सामान्य आहे, परंतु त्वचा लाल दिसू लागली तर त्वरित डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे.

उलटी होणे किंवा मळमळ होणे

तुम्हाला मळमळ किंवा वारंवार उलट्या होऊ लागल्यास, उपचारात उशीर करू नका. उलट्या थांबल्या नाहीत तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि दवाखान्यात दाखल होण्याची वेळ येऊ शकते

थकवा

उन्हाळ्यात तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, तर तुम्हालाही उष्णतेचा त्रास झालेला असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, जे लोक बाहेर उन्हात किंवा उष्णतेमध्ये बराच वेळ घालवतात त्यांना उष्णतेचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो. या अवस्थेत शरीरात थकवा जाणवू लागतो आणि तो कायम राहिल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

ही देखील आहेत लक्षणे

सतत चक्कर येणे किंवा मूर्च्छा येणे ही देखील उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत. उन्हाळ्यात सतत डोकेदुखी होणे हे देखील उष्माघाताचे लक्षण आहे.

असे करा उपाय

काही कारणास्तव, तुम्हाला उष्माघाताची परिस्थिती जाणवत असेल किंवा तुम्हाला या समस्येचा त्रास होत असेल, तर सर्वप्रथम वैद्यकीय उपचार घ्या.

आरोग्य बिघडू नये म्हणून WHO ने सुचवलेले ORS प्या. जर घरात मुले असतील तर त्यांना ते नक्कीच पिण्यास द्यावे.

उष्णतेच्या कचाट्यात आल्यानंतर शरीरातील पाण्याची कमतरता आधी पूर्ण करावी. यासाठी तुम्ही दिवसातून एकदा नारळ पाणी पिऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.