Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Steam bath : ‘स्टीम बाथ’ मुळे वजन होते कमी? जाणून घ्या काय आहेत स्टीमबाथचे फायदे… आंघोळीशी संबंधित हेल्थ टिप्स

स्टीम बाथमुळे वजन कमी होते का? जाणून घ्या याचे फायदे... जाणून घ्या तुम्हाला माहीत आहे का की आपल्या आंघोळीच्या एका पद्धतीनेनेही वजन कमी होऊ शकते. होय, आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार आहोत. स्टीम बाथ घेणे हा आजच्या काळात ट्रेंड झाला असला तरी, या बाथमुळे खरेच वजन कमी होते का, जाणून घ्या सविस्तर माहिती.

Steam bath : ‘स्टीम बाथ’ मुळे वजन होते कमी? जाणून घ्या काय आहेत स्टीमबाथचे फायदे... आंघोळीशी संबंधित हेल्थ टिप्स
स्टीमबाथImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 8:56 PM

Steam bath : स्टीम बाथ (Steam bath) घेणे हा आजच्या काळात ट्रेंड बनला आहे. प्रत्येकजण हे स्नान करणे आवश्यक मानतो. विशेष म्हणजे या आंघोळीचे विशेष फायदेही मिळतात. सन बाथ केवळ शरीराला डिटॉक्‍स करत नाही तर यामुळे, अनेक आजार दूर होतात. स्टीम बाथद्वारे देखील वजन कमी (Weight loss)केले जाऊ शकते. हा एक ट्रेंड बनला आहे, 160 डिग्री फॅरेनहाइट (सुमारे 71 सेल्सिअस) पेक्षा जास्त तापमान असलेल्या पाण्याने अंघोळ केल्याने, खरच वजन कमी होऊ शकते का, या आंघोळीचे नेमके काय फायदे होतात यासाठी संशोधन करण्यात आले आहे. अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की स्टीम बाथ केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळू शकतात, त्यापैकी एक म्हणजे चयापचय वाढणे. चयापचय वाढल्याने, (Increased metabolism) एखादी व्यक्ती आपले वजन कमी करू शकते.

1. हृदयाचे कार्य वाढवते

जर तुम्ही उच्च तापमानात आंघोळ केली तर हृदयाची गती वाढते, कारण यामुळे तुमचे रक्ताभिसरण देखील वाढते आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे चांगली झोपही येते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. एवढेच नाही तर रक्तदाबाची पातळी कमी होते, जर तुम्ही लो बीपीचे रुग्ण असाल तर तुम्ही ते टाळावे.

2. पाण्याने वजन कमी होते

सन बाथमधून तुमचे सुमारे 2-2.5 किलो वजन कमी होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या आंघोळीनंतर डाएटिंग आणि वर्कआउट केले तर तुमचे वजन लवकरात लवकर कमी होऊ शकते. घामाने शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढता येते.

हे सुद्धा वाचा

3. डिटॉक्सिफायर म्हणून काम करणे,

आंघोळ करताना गरम पाणी घेतल्याने जास्त घाम येतो. ज्याद्वारे तुम्ही टॉक्सिनपासून आराम मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. हे तुमच्यासाठी आरोग्यदायी आहे. तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल तर स्टीमबाथमुळे घामाद्वारे तुमची चरबी जळते.

4. स्नायूंना तंदुरुस्त बनवते

सनबाथ तुमच्या स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी वापरली जाते. वर्कआऊट करण्यापूर्वी ही आंघोळ केल्यास स्नायू चांगले कार्य करतात आणि त्यानंतर स्नायू रिकव्ह होण्यासही मदत होते.

5. स्टॅमिना वाढवतो

जर तुम्हाला व्यायाम करताना पटकन वाफ येऊ लागली असेल, तर तुमचा स्टॅमिना वाढवण्यासाठी तुम्ही ही आंघोळ करावी. यामुळे तुमची श्वास घेण्याची क्षमता वाढते आणि श्वासोच्छवासाचे कार्य सुधारते.

स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.