Heart Attack : दुर्मिळातली दुर्मिळ घटना! 9 वर्षांच्या मुलीला हार्टअटॅक, पण बायपास सर्जरीने वाचली, सोलापूरच्या अवनीची चित्तथरारक गोष्ट

Solapur Avani Nakate Heart News : माझ्या पाहण्यात आलेली आणि बायपास सर्जरी करण्यात झालेली ती आतापर्यंतची सर्वात लहान पेशंट आहे, असं डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी म्हटलंय

Heart Attack : दुर्मिळातली दुर्मिळ घटना! 9 वर्षांच्या मुलीला हार्टअटॅक, पण बायपास सर्जरीने वाचली, सोलापूरच्या अवनीची चित्तथरारक गोष्ट
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 8:23 AM

मुंबई : वय वर्ष 9. हे खेळायचं, बागडायचं आणि मजा मस्ती करण्याचं वय. या वयात हाटअटॅकचा आल्याचं कधी ऐकलंय? पण सोलापूरच्या अवनीसोबत नेमकं हेच घडलं. अवघ्या 9 वर्षांच्या अवनीला (Avani Nakate News) हृदयविकाराचा (heart Attack) झटका आला. डॉक्टरांनी पाहिल्यानंतर तेही चकीत झाले. अवनीचं हृदय एका 65 वर्षांच्या वयोवृद्ध आजोबांसारखं कमकुवत झालं होतं. अखेर तिच्यावर सर्जरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. डॉक्टरांनी वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यानंतर अखेर अवनीची बायपास सर्जरी (Bypass Surgery) झाली. या सर्जरीने अवनीचं आयुष्या आता पुन्हा बॅक टू नॉर्मल झालंय. पण मधल्या काळात अवनीच्या आईवडिलांची, कुटुंबीयांची, आणि तिची स्वतःची असलेली मानसिक शारीरिक अवस्था किती बिकट आणि जिकरीची असेल, याची कल्पनाही अंगावर शहारे आणणारीच आहे. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी बायपास सर्जरीमुळे एका चिमुकलीचा जीव वाचलाय. डॉक्टरांनीही ही दुर्मिळातली दुर्मिळ केस असल्याचं म्हटलंय. अवनी नकाते असं या मुलीचं नाव असून सध्या तिच्या प्रकृती सुधारणा होत असल्याचंही डॉक्टरांनी म्हटलंय.

खेळता खेळता छातीत कळ…

मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार, सोलापूरच्या अवनीवर मुंबईत बायपास सर्जरी करण्यात आली. दरम्यान, तिचं हृदय अत्यंत कमकुवत झालं असल्याचं निदान नेमकं कशामुळे झालं, याबाबत तिच्या वडिलांनी अधिक माहिती दिलीय. एकदा नेहमीप्रमाणे अवनी खेळत होती. खेळता खेळता अचानक तिच्या छातीत दुखू लागलं. छातीत जोरात कळ आली म्हणून आईवडिलांनी अवनीला सोबत घेतलं आणि दवाखाना गाठला. डॉक्टरांना दाखवण्यात आलं. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या. या टेस्टमध्ये अवनीची कोलेस्ट्रॉल लेव्ह अत्यंत हाय दाखवली. वयाच्या 65व्या वर्षी एखाद्या व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्ह जी असते, तशी अवनीची होती. तिचं हृदय वयोवृद्ध माणसाइतकं कमकुवत झालं होतं. डॉक्टरदेखील ही बाब पाहून चक्रावून गेले होते. यानंतर वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांमधून निदान होतं गेलं. आणि अखेर अवनीला नेमकं काय झालंय, ही बाब समोर आली.

हे सुद्धा वाचा

दुर्मिळातली दुर्मिळ केस…

एचएन रिलाईन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर शिवप्रकाश कृष्णनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवनीला हायपकोलेस्ट्रोलमिआ आहे. यामुळे अवनीची कोलेस्ट्रोल पातळी वाढते आणि त्यामुळे तिला हार्टअटॅकचा मोठा धोका संभवतो. छातीमधील दुखण्याचं नेमकं कारणंही हेच होतं, असही डॉक्टरांच्या तपासातून समोर आलं. जिथे नॉर्मल कोलेस्ट्रॉल लेव्ह 150 ते 200 mg/dl इतकं असायला हवं, तेच अवनीच्या बाबती 600 पेक्षा जास्त होतं. डॉक्टर कृष्णनाईक यांनी म्हटलंय की, मी माझ्या 30 वर्षांच्या करीअर पहिल्यांच अशी केस हाताळतोय. अवनीला झालेला हा आजार जेनेटीक असण्याची जास्त शक्यता असल्याचंही ते म्हणालेत. पण लहान मुलांमध्ये एका वृद्ध व्यक्तीसारखं हृदय आढळून आल्याचं मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं.

सुदैवानं बॅक टू नॉर्मल

अखेर निदान झाल्यानंतर मुंबईत अवनीवर बायपास सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. माझ्या पाहण्यात आलेली आणि बायपास सर्जरी करण्यात झालेली ती आतापर्यंतची सर्वात लहान पेशंट आहे, असं डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी म्हटलंय. वेळीच तिच्यावरील आजाराचं निदान झाल्यामुळे अवनीवर बायपास सर्जरी करता आली. अन्यथा धोका अधिक वाढत गेला असता, अशी भीतीदेखील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

अवनीवर बायपास सर्जरी झाली. सर्जरी यशस्वी झाली. आता अवनीच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. ती पुन्हा नेहमीसारखं हसू, खेळू आणि बागडू शकतेय. पण आता तिला आयुष्यभर औषधांचा आधार घ्यावा लागणार आहे. कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवावं लागणार आहे. ही घटना समोर आल्यानंतर डॉक्टरांनीही छातीमधील दुखण्याकडे दुर्लक्ष करणं जीवघेणं ठरु शकतं, असं म्हटलंय. अन्यथा हार्टअटॅक येऊन मृत्यू होण्याचा धोका असतो, असं जाणकार सांगतात. त्यामुळे वेळीच वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेणं नितांत गरजेचंय.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.