हिवाळ्यात राहा निरोगी; बनवा गुळाच्या या स्वादिष्ट रेसिपी

हिवाळ्यात गुळ खाण्यात अत्यंत फायदेशीर मानले जाते. गूळ हा गरम असल्याकारणाने शरीराला आपण उष्णता देतो. जाणून घेऊया गुळाच्या काही सोप्या रेसिपीज.

हिवाळ्यात राहा निरोगी; बनवा गुळाच्या या स्वादिष्ट रेसिपी
गुळाचे लाडू
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 6:32 PM

गुळाचे कार्य फक्त जेवणाची चव वाढवणे हेच नसून तर गुळ आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. गुळामध्ये प्रथिने, पोटॅशियम, हेल्दी फॅट, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम यासारख्या पोषक तत्त्वांचा समावेश आहे. गूळ हा गरम असतो त्यामुळे हिवाळ्यात त्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. जाणून घेऊया गुळापासून बनवलेल्या काही स्वादिष्ट रेसिपीज ज्या थंडीच्या काळात खाल्ल्या जाऊ शकतात.

तिळगुळाचे लाडू : साहित्य

१ वाटी गूळ २ कप भाजलेले तीळ १ चमचा तूप १ टीस्पून वेलची पावडर १ टेबलस्पून बारीक वाटलेले बदाम १ टेबलस्पून बारीक वाटलेले काजू

हे सुद्धा वाचा

कृती :

कढईमध्ये तूप गरम करून त्यात गूळ घालून वितळू द्या. यानंतर त्यामध्ये वेलची पावडर बदाम, काजू आणि भाजलेले तीळ मिक्स करा. हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लाडू बांधून घ्या.

शेंगदाणा चिक्की :

साहित्य

२५ ग्रॅम लोणी किंवा तूप २५० ग्रॅम शेंगदाणे २०० ग्रॅम गूळ १/२ कप पाणी

कृती :

सर्वप्रथम शेंगदाणे भाजून बारीक करून घ्या. पाक तयार करण्यासाठी पाण्यात गुळ घालून पाक घट्ट होईपर्यंत शिजवा. शिजल्यानंतर ट्रे मध्ये पाक टाका आणि त्यावर शेंगदाणे टाका. यानंतर हे मिश्रण कापून एका बाजूला ठेवा.

गोड शेव :

साहित्य

२०० ग्रॅम बेसन २५० ग्रॅम गूळ २ चमचे तेल १ चमचा तूप

कृती :

बेसन पिठामध्ये दोन थेंब तेल आणि थोडे पाणी घालून मळून घ्या. आता कढईत तेल घालून बेसन पिठाला शेवचा आकार देऊन तळून घ्या. दुसरीकडे पाण्यात गुळ मिसळून पाक तयार करा. तयार पाक शेव वर टाका. गोड शेव खाण्यासाठी तयार आहे.

गुळाची खीर:

साहित्य

१ कप भाजलेले तांदूळ 2 लिटर दूध १०० ग्रॅम गूळ ४ हिरव्या वेलची १/२ कप ड्राय फ्रूट्स १ टीस्पून चारोळी

सर्वप्रथम एका पातेल्यात दूध आणि भाजलेले तांदूळ शिजवायला ठेवा. दूध आणि तांदूळ शिजल्यानंतर वेलची आणि चारोळी मध्यम आचेवर शिजवून घ्या. नंतर यात गुळाचे तुकडे घालून खीर गूळ वितळेपर्यंत उकळवा. शेवटी ड्रायफ्रूट्स घालून खीरचा आस्वाद घ्या.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.