Cancer : महिलांच्या तुलनेत पुरुषांना कॅन्सर होण्याचा धोका अधिक !

काही आजार महिलांसाठी जास्त त्रासदायक ठरतात, तर काही आजारांमुळे पुरुषांना जास्त त्रास होतो. यामागे अनेक अनुवांशिक आणि बायोलॉजिकल कारणे असू शकतात.

Cancer : महिलांच्या तुलनेत पुरुषांना कॅन्सर होण्याचा धोका अधिक !
महिलांच्या तुलनेत पुरुषांना कॅन्सर होण्याचा धोका अधिकImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 5:11 PM

तुम्हाला जर कोणी सांगितलं की, कॅन्सर (कर्करोग) (Cancer) सारख्या गंभीर आजाराचा धोका महिलांपेक्षा (Female) पुरुषांना (Male) अधिक असतो, तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का ? तुम्हाला वाटेल हे खरं नाही. पण हे पूर्णपणे खरं आहे. आतापर्यंत अनेक अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे की, महिलांच्या तुलनेत पुरुषांना सर्व प्रकारच्या कॅन्सरचा धोका अधिक असतो. एवढेच नव्हे तर कॅन्सरमुळे मृत्यू पावणाऱ्या पुरुषांची (death due to cancer)संख्याही जास्त आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासातून याचे कारण समोर आले आहे.

नव्या अभ्यासातून समोर आली माहिती

मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, सर्व प्रकारचे कॅन्सर हे पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. या संदर्भात नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थने (NIH) केलेले एक संशोधन समोर आले आहे. त्यामध्ये 1.71 लाख पुरुष आणि 1.22 लाख महिलांनी सहभाग नोंदवला होता.

सुमारे 16 वर्ष संशोधकांनी या लोकांकडून माहिती गोळा केली व त्याचे विश्लेषण केले. या संशोधनातील निष्कर्ष अतिशय धक्कादायक आहेत. जैविक फरकामुळे (Biological Difference) महिला आणि पुरुषांमध्ये कर्करोगाचा धोका वेगवेगळा असल्याचे यामध्ये आढळून आले आहे.

हे सुद्धा वाचा

व्यक्तीची जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, बॉडी मास इंडेक्स, उंची, त्यांच्या शारीरिक हालचाली, आहार आणि वैद्यकीय इतिहास या गोष्टींचा त्यावर फारसा परिणाम होत नाही, असे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

हे घटकही ठरतात जबाबदार

पुरूष व महिलांमधील हार्मोन्स, उदा. एस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आणि जेनेटिक्स यातील फरकामुळे (महिला व पुरुष या दोघांमधील) कॅन्सरचा धोका वेगवेगळा असू शकतो, असा अंदाज या संशोधकांनी व्यक्त केला आहे.

स्त्रियामध्ये आढळणारे एक्स गुणसूत्र (x chromosome) हेही (कॅन्सरच्या) घातक जनुकांना दडपू शकतात. कॅन्सरच्या उपचारांसाठी तयार केल्या जाणाऱ्या औषधांची क्लिनिकल चाचण्या केल्यावर हे समजणे सोपे होऊ शकते.

या फरकामागचे नेमके कारण समोर आले तर महिला व पुरुषांवर परिणामकारक उपचार करता येतील. सध्या याबाबत अनेक संशोधनं करण्यात येत आहेत.

महिला व पुरुषांमध्ये कॅन्सरचा धोका

– पुरुषांमध्ये ब्लॅडर कॅन्सरचा (Bladder Cancer) धोका महिलाच्या तुलनेत 3.30 टक्के अधिक असतो.

– गॅस्ट्रिक कार्डिआ कॅन्सरचा (Gastric Cardia Cancer) धोका महिलांपेक्षा पुरुषांमध्ये 3.49 टक्के अधिक असतो.

– गॉलब्लॅडर कॅन्सर (Gallbladder Cancer) आणि थायरॉइड कॅन्सरचा (Thyroid Cancer) धोका पुरुषांमध्ये कमी असतो.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.