Alert for Men : 40 च्या आसपास पोहोचताच पुरुषांनी सावध व्हावे, या आजारांचा होऊ शकतो धोका!
वयाच्या 40 व्या वर्षी पुरुषांना आर्थिक सुरक्षेची चिंता वाटू लागते. त्याचबरोबर आजच्या काळात नोकरीचे दडपणही खूप वाढले आहे. यामुळे त्यांना तणाव आणि मूड स्विंगचा त्रास होतो. स्वभावात चिडचिडेपणा येऊ लागतो.
Alert for Men : सध्या धक्काधक्काच्या जीवनात सगळ्याच गोष्टी सोप्या आहेत असे नाही. कोठेही जा तुम्हाला हे पळावेच लागते. आधी शिक्षणासाठी (Education) नंतर नोकरीसाठी आणि त्यानंतर कुटूंबासाठी. त्यामुळे कमीवयातच अनेक आजार हे होण्याचा धोका असतो. तर हे आजार महिलांना लगेच होतात. त्यामुळे अनेकदा महिलांना (Women) वयानुसार त्यांच्या आरोग्याबाबत सावध राहण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र पुरुषही या बाबतीत मागे नसतात. वयाच्या 40 च्या आसपास पुरूषांचे (Men) शरीर देखील संवेदनशील बनते. वयाच्या या टप्प्यावर, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये त्यांना भविष्याची काळजी वाटू लागते. शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते आणि जबाबदाऱ्यांचे ओझे वाढतं जाते. त्यामुळे ताणतणाव वाढतो. ज्यामुळे अनेक आजार (Diseases) 40 च्या आसपास असणाऱ्या पुरूषांना घेरायला लागतात. तुमचीही अनेक जणहे वयाच्या चाळीशीत असाल किंवा अनेक जणहे चाळीशी गाठणार असाल, तर आत्ताच सावध व्हा. जेणेकरुन वेळेपूर्वी येणाऱ्या सर्व समस्यांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकाल.
मधुमेह
वाढत्या वयानुसार शरीराचे वजनही वाढते. अशावेळी मधुमेहाचा धोका वाढतो. तणावामुळे त्याचा धोका आणखी वाढतो. जर तुमचा कौटुंबिक इतिहास असेल, तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता सामान्य लोकांपेक्षा जास्त असते. अशा परिस्थितीत, आपण खूप सतर्क असणे आवश्यक आहे. यासोबतच आहारावर नियंत्रण ठेवण्याची आणि नियमित व्यायामाची गरज आहे.
स्नायू कमजोरी
आपल्या शरीराची हालचाल स्नायूंमुळे होते. 40 च्या आसपास स्नायू कमकुवत होऊ लागतात. स्नायू कमकुवत झाल्यामुळे फ्रॅक्चरची शक्यताही अनेक पटींनी वाढते. त्यांना सशक्त बनवण्यासाठी व्यायाम आणि चांगला आहार आवश्यक आहे. पण आजच्या जीवनशैलीमुळे अन्न आणि शारीरिक श्रम संपुष्टात आले आहेत. सोयीमुळे लोकांचे शरीर वेळेआधीच खराब होत आहे.
तणाव आणि नैराश्य
वयाच्या 40 व्या वर्षी पुरुषांना आर्थिक सुरक्षेची चिंता वाटू लागते. त्याचबरोबर आजच्या काळात नोकरीचे दडपणही खूप वाढले आहे. यामुळे त्यांना तणाव आणि मूड स्विंगचा त्रास होतो. स्वभावात चिडचिडेपणा येऊ लागतो. ही अशी वेळ आहे जेव्हा पुरुषांना त्यांच्या करिअरमध्ये उच्च दबावाचा सामना करावा लागतो. मुलांच्या करिअरची चिंता सतावू लागते. दुसरीकडे, पुरुषांना घाईघाईने त्यांचे त्रास शेअर करणे आवडत नाही. अशा स्थितीत त्यांच्या मनाचा गुदमरतो. यामुळे अनेकवेळा ते डिप्रेशनमध्येही जातात. मन निरोगी ठेवण्यासाठी योगासने आणि ध्यानधारणा नियमितपणे करावी.