Migraine: मायग्रेन केवळ डोकेदुखीचे नव्हे तर मनोविकाराचेही असू शकते लक्षण!

मायग्रेन हा गंभीर डोकेदुखीचा आजार आहे. मात्र यामध्ये बऱ्याचदा डोक्याच्या एका बाजूस आणि डोळ्यांमध्ये तीव्र वेदना होतात. बहुतांश लोकांना मायग्रेनच्या वेदना होत असताना मळमळ, उलटी सारखे त्रासही होऊ शकतात.

Migraine: मायग्रेन केवळ डोकेदुखीचे नव्हे तर मनोविकाराचेही असू शकते लक्षण!
मायग्रेनवर कशी करालं मात?
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 4:24 PM

मायग्रेन (Migraine)हा गंभीर डोकेदुखीचा (Headache) आजार आहे. मात्र यामध्ये सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळ्या, बऱ्याचदा डोक्याच्या एका बाजूस आणि डोळ्यांमध्ये तीव्र वेदना होतात. बहुतांश लोकांना मायग्रेनच्या वेदना होत असताना मळमळ, उलटी सारखे त्रासही होऊ शकतात. तर काही लोकांच्या वेदना उलटी झाल्यानंतर कमी होतात. मात्र मायग्रेनच्या वेदना खूप त्रासदायक आणि अस्वस्थ करणाऱ्या मानल्या जातात. मायग्रेनचा ॲटॅक आलेल्या व्यक्तीला शांत आणि अंधाऱ्या खोलीत गेल्यावर बरं वाटतं, थोडा आराम मिळतो.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, तुम्हालाही अनेकदा मायग्रेनचा त्रास होत असेल तर त्याला फक्त डोकेदुखी समजण्याची चूक करू नका. काही परिस्थितींमध्ये मायग्रेन हे, सायकोसोमॅटिक म्हणजेच मानसिक विकारांमुळेही (psychiatric disease) होऊ शकते.

अमेरिकन मायग्रेन फाउंडेशनच्या मतानुसार, मळमळ आणि उलट्या ही सामान्यत: मायग्रेनच्या सुरुवातीच्या काळात उद्भवणारी समस्या असते. जर या प्रकारची वेदना वारंवार होत राहिली तर त्याचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांना भेटणे खूप महत्वाचे ठरते.

मायग्रेनची समस्या जर मानसिक आजारांमुळे होत असेल तर त्यासाठी तातडीने मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला आणि उपचार आवश्यक असतात. मायग्रेनची कारणे काय आणि त्यापासून आराम मिळण्याचे मार्ग, याबद्दल जाणून घेऊया.

संशोधकांना असे आढळले आहे की चिंता, ताण-तणाव आणि नैराश्या यासारख्या परिस्थितीत मायग्रेनची समस्या होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच मायग्रेनची स्थिती उद्भवल्यास, आरोग्य तज्ञ त्या व्यक्तीला मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल देखील प्रश्न विचारतात.

काही अभ्यासांमध्ये संशोधकांना स्किझोफ्रेनिया आणि मायग्रेन यांच्यादरम्यान क्लिनिकल संबंध आढळला आहे. याच कारणामुळे जर तुम्हाला खूप दिवसांपासून मायग्रेनचा त्रास होत असेल आणि उपचारांच्या माध्यमातून तो बरा होत नसेल याबाबत मानसोपचारतज्ज्ञांशी बोलले पाहिजे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

क्लिनिकल चाचण्यांच्या समीक्षणात संशोधकांना असं आढळलं की, मायग्रेनच्या वेदनांमध्ये आल्याचा फायदा होऊ शकतो. आल्याची पावडर ही मायग्रेन ग्रस्त लोकांवर उपचार करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी असू शकते, असे शास्त्रज्ञांना आढळले.

आल्याच्या पावडरीच्या वापराने 2 तासांत मायग्रेनचा त्रास कमी होऊ शकतो. मळमळ व उलट्या टाळण्यास मदत होऊ शकते. मात्र, संशोधकांचे म्हणणे आहे की हा उपचार सर्व लोकांमध्ये प्रभावी नाही. त्याच्या सत्यतेसाठी अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

मायग्रेन ही मानसिक विकारांमुळे उद्भवणारी समस्या असू शकते याला अभ्यासातून दुजोरा मिळत असल्याने ताण-तणाव मॅनेज करण्याच्या उपायांचा वापर केल्यास मायग्रेनचा त्रास कमी होऊ शकतो.

10 पैकी 7 जणांमध्ये तणावामुळे मायग्रेनची लक्षणं उद्भवतात, असं डॉक्टर सांगतात. कोमट पाण्याने आंघोळ करणे, संगीत ऐकणे किंवा दीर्घ श्वास घेणे असे स्ट्रेस मॅनेजमेंट करणारे उपाय हे मायग्रेनचा त्रास कमी करण्यासंदर्भात फायदेशीर ठरू शकतात.

मॅग्नेशिअम हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या खनिजांपैकी एक आहे. त्याच्या कमतरतेमुळेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. मायग्रेनचा ॲटॅक आलेला असताना मॅग्नेशिअमच्या काही सप्लीमेंट्स / गोळ्या घेतल्यावर काही लोकांना आराम मिळाल्याचे संशोधनात आढळून आले आहे.

आहाराच्या माध्यमातूनही मॅग्नेशिअमची कमतरता भरून काढता येते. कोंडायुक्त गहू, पालक, बदाम, काजू, शेंगदाणे, डार्क चॉकलेट आणि ॲवोकाडो यांचे सेवन केल्याने मॅग्नेशिअम मिळू शकते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मॅग्नेशिअमच्या कोणत्याही सप्लीमेंट्स /गोळ्या घेऊ नयेत.

(ही बातमी माहितीच्या आधारावर दिली आहे. उपयोग करायचा असल्यास तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.