Raj Thackeray : ‘आमच्या घरात सुनेच्या रुपाने डॉक्टर आले, तेव्हापासून….’, वाढत्या वजनावर काय म्हणाले राज ठाकरे? Video
Raj Thackeray : "देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला जायचं आहे आणि मी चायनीजची ऑर्डर दिलीय" असं राज ठाकरे गंमतीशीर अंदाजात म्हणाले. राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत मुलाखतकाराला उत्तर दिली. आज आपण सिनेमागृहात, मॉलमध्ये गेल्यानंतर बऱ्याच मुलांमध्ये लठ्ठपणा दिसतो, त्यावर राज ठाकरे यांना विचारलं.
वर्ल्ड चाईल्ड ओबेसिटी संदर्भात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लहान मुलांच वाढत वजन, लठ्ठपणा सध्याच्या काळात एक समस्या बनली आहे. या ओबेसिटीच्या विषयावर जनजागृती करण्यासाठी एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी दोघांची मुलाखत घेण्यात आली. राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत मुलाखतकाराला उत्तर दिली. आज आपण सिनेमागृहात, मॉलमध्ये गेल्यानंतर बऱ्याच मुलांमध्ये लठ्ठपणा दिसतो, त्यावर राज ठाकरे यांना विचारलं.
त्यावर राज ठाकरेंनी मिश्किलपणे ‘मला कळलं असतं, तर मीच वजन कमी नसतं का केलं?’ असं म्हटलं. “आमच्या सूनेच्या रुपाने डॉक्टर आमच्या आयुष्यात आले, पण तेव्हापासून माझं वजन वाढायला लागलय. राज ठाकरे यांनी असं म्हणताच समोरच्या गर्दीमध्ये एकच हंशा पिकला. “देवेंद्रजी जे म्हणाले ती गोष्ट महत्त्वाची आहे. खेळ खेळले पाहिजेत. मी सकाळी टेनिस खेळतो, 470 कॅलरीज बर्न होतात. मी योग्य मार्गावर आहे” असं राज ठाकरे म्हणाले.
डोंगरे बालामृतबद्दल ऐकलेलं
लहान मुलांमधील या वाढत्या लठ्ठपणावर जनजागृती करण्यासाठी काय कराल? यावर त्यांनी खूपच गंमतीशीर उत्तर दिलं. “लहान असताना डोंगरे बालामृतबद्दल ऐकलेलं. मुलं त्याने गुटगुटीत व्हायची. आता तुम्ही सांगता, मुलं गुटगुटीत असून असून चालणार नाही” असं राज ठाकरे म्हणाले.
फास्ट फूडबद्दल राज ठाकरे काय म्हणाले?
“आई वडिलांना मुलं गुटगटीत आहेत, म्हणजे तो आजार आहे, हे कळायला मार्ग नाही. हे कसं ओळाखायच हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे, नाहीतर ती गोष्ट कळणारच नाही” असं राज ठाकरे म्हणाले. ‘सध्याच्या काळात फास्टफूडमुळे ही गोष्ट जास्त बळावत चाललीय’ असं राज म्हणाले. ‘घरातलं जेवत होते, तो पर्यंत अशी परिस्थिती नव्हती. आता जे चांगलं ते वाईट आणि जे वाईट ते चांगल असं झालय” ‘मी चायनीजची ऑर्डर दिलीय’
“जापानमध्ये मुलांना डब्बेच आणू देत नाहीत. शाळेतच मुलांना जेवण बनवलं जातं, सर्व मिळून तिथे जेवतात. शाळेतच चांगलं अन्न मिळालं तर कशाची गरज नाही” असं राज ठाकरे म्हणाले. “देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला जायचं आहे आणि मी चायनीजची ऑर्डर दिलीय” असं ते गंमतीशीर अंदाजात म्हणाले.