Monkeypox : संक्रमित व्यक्तीच्या सतत समोरासमोर राहिल्यास होऊ शकतो मंकीपॉ़क्स! अमेरिकन CDC चा दावा
मंकीपॉक्स लक्षणे असलेल्या रुग्णाच्या शारीरिक संपर्कातून आणि त्याचे कपडे, बिछाण्याला स्पर्श केल्यानं पसरत असल्याचं CDC प्रमुख रोशेल वेलेन्स्की यांनी सांगितलं आहे.
मुंबई : कोरोनानंतर आता मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूने जगातील अनेक देशात थैमान घातलं आहे. अशावेळी अमेरिकेतील आरोग्य एजन्सी यूएस सेटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (US CDC) ने मोठा दावा केलाय. मंकीपॉक्स विषाणू हवेतून पसरू शकतो. पण केवळ संक्रमित व्यक्तीच्या सततच्या समोरासमोर संपर्कात आल्यावर त्याचा संसर्ग होतो असा दावा CDC कडून करण्यात आलाय. डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार मंकीपॉक्स लक्षणे (Monkeypox symptoms) असलेल्या रुग्णाच्या शारीरिक संपर्कातून आणि त्याचे कपडे, बिछाण्याला स्पर्श केल्यानं पसरत असल्याचं CDC प्रमुख रोशेल वेलेन्स्की यांनी सांगितलं आहे.
मंकीपॉक्सचा विषाणू हवेर रेंगाळणार नाही
त्याचबरोबर शरिरावर पुरळ निर्माण करणाऱ्या मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी फेस मास्कची गरज आहे की नाही असाही एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याबाबत एका एपिडेमियोलॉजिस्टने स्पष्ट केले की पुरळ निर्माण करणारा विषाणू कोविडसारखा ‘हवेत रेंगाळणार नाही’. तसंच “हा आजार अनौपचारिक संभाषणातून, किराणा दुकानात जाण्या येण्याने किंवा दारावरील नॉबसारख्या गोष्टींना स्पर्श केल्यानं पसरत नाही”, असंही सांगण्यात आलं.
आतापर्यंतची सर्व प्रकरणं थेट संपर्काशी संबंधित
CDC च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही आजपर्यंत मंकीपॉक्सची पाहिलेली आतापर्यंतची सर्व प्रकरणं थेट संपर्काशी संबंधित आहेत. आरोग्य परिषदेवेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी सिफिलीस, गोनोरिया आणि क्लॅमिडीयासह कोणत्याही लैंगिक संक्रमित असलेल्या अमेरिकन नागरिकांना मंकीपॉक्सची चाचणी करण्यास सांगण्यात आलंय. बऱ्यात रुग्णांना गुप्तांग तसंच पार्श्वभागावर पुरळ किंवा फोड येत आहेत, असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलं. मंकीपॉक्ससह सह-संसर्गाची अनेक प्रकरणं आणि लैंगिक संक्रमित रोगही नोंदवण्यात आले आहेत. इतकंच नाही तर वॉलेन्स्की यांनी सांगितलं की हा विषाणू फक्त हवेतून संसर्ग झालेल्या लोकांच्या तोंडातून बाहेर पडलेल्या थुंकीवाटे पसरला जातो.
मंकीपॉक्सची प्रमुख लक्षणे
मंकीपॉक्स हा आजार संसर्गजन्स असल्यामुळे धोका अधिक आहे. मंकीपॉक्समध्ये रूग्णांची भांडे, कपडे, अंथरूण, पांघरूण किंवा रूग्णाने वापरलेली कोणतीही गोष्ट आपण वापरली तर आपल्याला मंकीपॉक्सचा संसर्ग होऊ शकतो. मंकीपॉक्समध्ये हातावर किंवा अंगावर मोठी फोड येतात. तसेच मंकीपॉक्समध्ये हलका ताप आणि अंगावर पुरळ देखील येते. अर्जेंटिनामध्ये मंकिपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला होता. हा रुग्ण स्पेनवरुन परतला होता. त्याच्या अगोदरच अफ्रिकेतून दुबईत आलेल्या एका महिलेलाही मंकीपॉक्स झाल्याचे निष्पन्न झाले होते.