Monkeypox : लैंगिक गैरवर्तन,गळाभेट अन् चुंबनावरही आता बंधने! कोरोना प्रमाणे मंकीपॉक्स वरील मार्गदर्शक तत्त्वे लागू

Monkeypox guidelines: जगभरातील मंकीपॉक्सच्या वाढत्या दहशतीने सरकार आणि आरोग्य तज्ञ तणावात आहेत. कोरोनाचा कहर अद्याप शांत झाला नसतांना आणि त्यातून जग सावपण्यापूर्वीच मंकीपॉक्स नावाचे नवे संकट समोर आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) जगातील सर्वच सरकारांना आता सावध केले आहे आणि मानवाच्या लैंगिक वर्तनाबद्दल सतर्कतेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Monkeypox : लैंगिक गैरवर्तन,गळाभेट अन् चुंबनावरही आता बंधने! कोरोना प्रमाणे मंकीपॉक्स वरील मार्गदर्शक तत्त्वे लागू
संग्रहित छायाचित्रImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 3:52 PM

मुंबई : मंकीपॉक्सने थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसपासून जग अद्याप सावरले नव्हते. दरम्यान, शरीरात पुरळ उठणे (rash), डोकेदुखी, थकवा, ताप यांसारखी लक्षणे असलेल्या या मंकीपॉक्स आजाराने (Monkeypox disease) आरोग्य तज्ज्ञ आणि सरकारची झोप उडवली आहे. ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, आतापर्यंत जगातील 78 देशांतील 18,000 लोकांमध्ये मंकीपॉक्स पसरला आहे. यातील 70 टक्के प्रकरणे युरोपमधून तर 25 टक्के अमेरिकेतील आहेत. मात्र, दिलासा देणारी बाब म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊनही आत्तापर्यंत केवळ ५ जणांचा मंकीपॉक्समूळे मृत्यू झाला आहे. तर जगभरात सुमारे 18 हजार लोकांना रुग्णालयात दाखल (admitted to hospital) व्हावे लागले आहे. चिंतेची बाब म्हणजे बुधवारी फक्त नोएडा आणि गाझियाबादमधून मंकीपॉक्सचे 3 संशयित रुग्ण आढळले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. झारखंडमधूनही मंकीपॉक्सचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. नोएडातील एका महिलेचा नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जागतिक आरोग्य संघटना WHO च्या म्हणण्यानुसार मंकीपॉक्स हा आजार प्राण्यांपासून मानवांमध्ये आला आहे. जेव्हा त्याचा संसर्ग होतो तेव्हा एखाद्या व्यक्तीला ‘चेचक’ सारखी लक्षणे दिसतात. जरी मंकीपॉक्स केवळ काही प्रकरणांमध्येच प्राणघातक ठरतो. मात्र याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

केंद्र सरकारची मार्गदर्शक सूचना

मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार, मंकीपॉक्सच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला 21 दिवस वेगळे राहणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे मंकीपॉक्सचा उष्मायन काळ(इनक्युबेशन पिरियड) २१ दिवसांचा असतो. याशिवाय मास्क घालणे बंधनकारक आहे. सतत हात धुणे. मंकीपॉक्सने प्रभावित त्वचा पूर्णपणे झाकून ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.

हे सुद्धा वाचा

WHO मार्गदर्शक तत्त्वे

मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, मंकीपॉक्सपासून दूर राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याचा संसर्ग टाळणे.

दोन पुरुषांमध्ये समलैंगिक संबंध…धोक्याची घंटा

मंकीपॉक्स टाळण्यासाठी, दोन पुरुषांमधील लैंगिक संबंधांबद्दल सर्वात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे, असे डब्ल्यूएचओचे मत आहे. डब्ल्यूएचओच्या मते, अशा लोकांनी नवे सेक्स पार्टनर बनवू नये. ब्रिटनमध्ये या आजाराची लागण होण्यात गे-क्लबचा मोठा वाटा आहे. डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्सचे 98% प्रकरणे पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये आहेत. परंतु मंकीपॉक्स कोणालाही होऊ शकतो, म्हणूनच WHO ने शिफारस केली आहे की, जगभरातील देशांनी मुले, गर्भवती महिला आणि इतर असुरक्षित गटांमध्ये या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कारवाई करावी.

मिठी मारणे, चुंबन घेणेही आता…धोकादायक

डब्ल्यूएचओच्या मते, जवळचा संपर्क, गळाभेट, मिठी मारणे, चुंबन घेणे, संक्रमित बिछाना आणि टॉवेल वापरणे देखील मंकीपॉक्सच्या प्रसारास कारणीभूत ठरू शकते. WHO च्या मते, मंकीपॉक्स टाळण्यासाठी या सावधगिरीचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.