अहमदनगरमध्ये कोरोनानंतर म्युकर मायकोसिसचं थैमान, तब्बल 61 जणांना संसर्ग, औषधांसाठी नातेवाईकांची वणवण

अहमदनगर जिल्ह्यातही आता म्युकर मायकोसिस आजराचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 61 म्युकर मायकोसिसचे रुग्ण असल्याचं समोर आलंय.

अहमदनगरमध्ये कोरोनानंतर म्युकर मायकोसिसचं थैमान, तब्बल 61 जणांना संसर्ग, औषधांसाठी नातेवाईकांची वणवण
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 1:20 AM

अहमदनगर : एकिकडे कोरोनाचं थैमान सुरु आहे तर दुसरीकडे कोरोनानंतर उद्धवणारे जीवघेणे आजार रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची काळजी वाढवत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही आता म्युकर मायकोसिस आजराचा धोका वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल 61 म्युकर मायकोसिसचे रुग्ण असल्याचं समोर आलंय. या सर्वांवर नगरमधील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, या आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा जिल्ह्यात तुटवडा आहे. त्यामुळे इंजेक्शन शोधण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत (Mucor Mycosis Patients increasing in Ahmednagar shortage of medicine).

अहमदनगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे म्हणाले, “अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रात एकूण 78 डीसीएससी आहेत. या केंद्रांमधून आम्ही म्युकर मायकोसिसची माहिती घेतली. त्यात शहरात एकूण 61 रुग्णांना म्युकरमायकोसिसची लक्षणं दिसून आल्याचं समोर आलंय. यात शहरी भागात किती आणि ग्रामिण भागात किती ही माहिती गोळा करण्याचं काम सुरु आहे. मात्र, सद्यस्थितीत अहमदनगर शहरात एकूण 61 रुग्ण दाखल आहेत.”

म्युकरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा

“म्युकरमायकोसिससाठी अँम्पिटोरिसम वीम अशी काही अँटिफंगल इंजेक्शन आहेत. त्याची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. आपल्याकडे शहरात तर हे औषध मिळालेलं नाही. आम्हालाही या औषधाच्या मागणीसाठी काही फोन आले. यानंतर आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडे याबाबत मागणी केलीय. त्यामुळे शासनाकडून ही औषधं लवकरच उपलब्ध होऊ शकतील,” असंही शंकर गोरे यांनी नमूद केलं.

म्युकर मायकोसिसमुळे झालेल्या मृत्यूंबाबत विचारलं असता अद्याप या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांची कोणतीही माहिती आलेली नसल्याचं पालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

कोरोनाची तिसरी लाट आलेल्या अमरावतीत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

म्युकरमायकोसिस रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

‘रेमडेसिव्हीर’ पाठोपाठ वर्ध्यात ‘एम्फेटेरेसिन बी’ इंजेक्शनचीही निर्मिती, म्युकरमायकोसिस रुग्णांना दिलासा मिळणार

व्हिडीओ पाहा :

Mucor Mycosis Patients increasing in Ahmednagar shortage of medicine

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.