Mucormycosis : गुजरातमध्ये 500 कोरोना रुग्णांना ‘म्युकर मायकोसिस’, 20 जणांचे डोळे निकामी, तर 10 जणांचा मृत्यू
कोरोनाने थैमान घातलंय. सध्या कोरोना रुग्णांमध्ये वेगळ्याच प्रकारच्या संसर्गाची उदाहरणं समोर येत आहेत. अगदी कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्येही अशाप्रकारची लक्षणं दिसून येत आहेत.

या आजारात नाकात खाज सुटणे, त्वचा लाल होणे अशी लक्षणं दिसतात. त्वचा लाल पडल्यानंतर लगेच उपचार सुरु केले तर डेड स्किन तयार होत नाही. हा आजार म्हणजे बुरुशीचा संसर्ग आहे. याचा प्रादुर्भाव सर्वाधिक डायबेटिस रुग्णांमध्ये होते.
- कोरोनाने थैमान घातलंय. सध्या कोरोना रुग्णांमध्ये वेगळ्याच प्रकारच्या संसर्गाची उदाहरणं समोर येत आहेत. अगदी कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्येही अशाप्रकारची लक्षणं दिसून येत आहेत.
- गुजरातमध्ये कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांवर हार्ट अटॅक, लिव्हर, ब्रेन स्ट्रोक अशा आजारांचा हल्ला होत आहे. याशिवाय सध्या आणखी एक नवा आजार या रुग्णांमध्ये आढळत आहे. गुजरातमध्ये डायबेटिस असलेल्या रुग्णांना म्युकर मायकोसिस हा आजार होत आहे.
- गुजरातमधील अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयामध्ये कोरोनाच्या 120 रुग्णांची नोंद आहे. यातील 10 जणांचा मृत्यू झालाय. या सर्वांच्या मृत्यूचं कारण हा नवा म्युकर मायकोसिस हा आजार आहे. याशिवाय अहमदाबादमध्ये 10 पेक्षा अधिक लोकांना कोरोनामुळे आपले डोळे गमवावे लागले आहेत. त्यामुळेच या आजाराची तुलना कॅन्सरशी केली जात आहे.
- सुरतमध्ये आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांना म्युकर मायकोसिस हा आजार झालाय. त्यामुळे 20 रुग्णांनी आपले डोळे गमावले आहेत. याशिवाय वडोदरा आणि राजकोटमध्ये देखील म्युकर मायकोसिस अनेक प्रकरणं समोर आली आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत अशा 500 रुग्णांची नोंद झालीय.
- तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 50 वर्षांवरील नागरिक आणि डायबेटिस झालेल्या रुग्णांना याचा अधिक त्रास होत असल्याचं समोर आलंय.
- या आजारात नाकात खाज सुटणे, त्वचा लाल होणे अशी लक्षणं दिसतात. त्वचा लाल पडल्यानंतर लगेच उपचार सुरु केले तर डेड स्किन तयार होत नाही. हा आजार म्हणजे बुरुशीचा संसर्ग आहे. याचा प्रादुर्भाव सर्वाधिक डायबेटिस रुग्णांमध्ये होते.