Navaratri | नवरात्रीच्या उपवासामध्ये हे पदार्थ खाणं टाळा, नाहीतर उपवासाचा काहीस नाही फायदा!
उपवासाच्या दिवसांमध्ये कोणते पदार्थ खायचे आणि कोणते नाही खायचे याबाबत भरपूर लोकांच्या मनात संभ्रम असतो. तर आता आपण काही अशा पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत जे नवरात्रीच्या दिवसांमध्ये खाणं टाळावं.
मुंबई : सध्या नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हिंदू धर्मात नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. तसेच या नऊ दिवसांमध्ये लोक उपवास करतात, दुर्गा देवीची पूजा करतात. तर काही लोकांचे उपवास खूप कडक असतात, म्हणजेच काही लोक निरंकार उपवास करतात तर काही लोक फक्त फळ खातात. तर काही लोक खिचडी, भगर खातात. पण काही लोकांच्या मनात नवरात्रीच्या उपवासामध्ये नक्की कोणते पदार्थ खाऊ नये याबाबत संभ्रम असतो. कारण नवरात्रीचे उपवास हे फार कडक उपवास असतात.
मसाले – नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही जर उपवास करत असाल तर काही मसाले आहेत जे तुम्ही खाणे टाळले पाहिजे किंवा तुम्ही खिचडी, भगर करत असाल तर त्यामध्ये या मसाल्यांचा वापर चुकूनही करू नका. यामध्ये हळद आणि गरम मसाले यांचा समावेश आहे. तर तुमचा उपवास असेल तर चुकूनही हळद आणि गरम मसाल्याचा समावेश तुमच्या खिचडीमध्ये किंवा भगर मध्ये करू नका. तसेच नवरात्रीच्या काळात जिरेपूड वापरणे देखील टाळा.
धान्य – नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास करत असाल तर धान्यापासून दूर राहा. मग या धान्यामध्ये गहू, तांदूळ, बेसन, कॉर्नफ्लॉवर, रवा या गोष्टींचा समावेश आहे. तर उपवासाच्या दिवसांमध्ये या धान्यांचा समावेश तुमच्या आहारात करू नका. तसेच नाचणी, बाजरीचे किंवा ज्वारीच्या पिठाचा देखील समावेश तुमच्या आहारात करू नका.
भाज्या- नवरात्रीमध्ये तुम्ही उपवास करत असाल तर भाज्यांचा समावेश तुमच्या आहारात करणे टाळावे. या उपवासाच्या दिवसांमध्ये काही भाज्या खाल्ल्या तर चालतात पण काही भाज्या चुकूनही खाऊ नका. उपवासाच्या दिवसांमध्ये तुम्ही लसुन, कांदा चुकूनही खाऊ नका. तसेच कांदा, टोमॅटो, बटाटा, पालक या भाज्यांचं सेवन तुम्ही उपवासाच्या दिवसांमध्ये करू शकता. महत्त्वाचं सांगायचं झालं तर टोमॅटोला लोक फळ मानतात त्यामुळे त्याचा फळ म्हणून तुम्ही उपवासात समावेश करू शकता.
मांसाहारी पदार्थ आणि दारू – नवरात्रीच्या उपवासांमध्ये मांसाहारी पदार्थ, अंडी या पदार्थांचे चुकूनही सेवन करू नका, असे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे. तसेच दारूचे सेवन देखील करू नका. कारण नवरात्रीच्या दिवसांमध्ये अशा गोष्टींचे सेवन करणे म्हणजे पाप मानलं जातं. त्यामुळे अशा गोष्टीचे सेवन चुकून पण करू नका.
मीठ – नवरात्रीच्या उपवासाच्या दिवसांमध्ये पांढऱ्या मिठाचा वापर करू नका. पांढर्या मिठाऐवजी तुम्ही काळ्या मिठाचा वापर करू शकता. काळ्या मिठामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, जे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये जर तुम्ही उपवास करत असाल तर काळ्या मिठाचे सेवन करा.