VIDEO | संसर्ग वाढतोय, चिंता वाढतेय; वृद्धांचं कोरोनापासून संरक्षण कसं कराल ?,पाहा सगळ्या टिप्स 1 मिनिटात

कोरोना विषाणूचा धोका घरातील वृद्ध आणि लहान मुलांना जास्त असल्यामुळे विशेषत्वाने त्यांची काळजी घेणं हेसुद्धा तितकच महत्त्वाचं आहे. (corona infection ndma tips)

VIDEO | संसर्ग वाढतोय, चिंता वाढतेय; वृद्धांचं कोरोनापासून संरक्षण कसं कराल ?,पाहा सगळ्या टिप्स 1 मिनिटात
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 8:44 PM

मुंबई : देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. राज्यात तर कोरोनाची दुसरी लाट आलीये. कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे करोना प्रतिबंधक नियम पाळणं गरजेचं होऊन बसलंय. कोरोना विषाणूचा धोका घरातील वृद्ध आणि लहान मुलांना जास्त असल्यामुळे विशेषत्वाने त्यांची काळजी घेणं हेसुद्धा तितकच महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टींची गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (National Disaster Management Authority) काही टिप्स  दिल्या आहेत. घरातील वृद्धांची काळजी नेमकी कशी घ्यावी ?, त्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काय करावे? याबाबतची सर्व माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपल्या एका मिनिटाच्या व्हिडीओमध्ये दिलीये. (NDMA National Disaster Management authority given safety tips to avoid corona infection to elder people)

वृद्धांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काय करावे?

घरातील वृद्धांना त्यांची कामं पूर्ण क्षणतेने करणे जमत नाही. त्यामुळे त्यांच्या गरजांची दखल कुटुंबातील इतर सदस्यांनी घेणं गरजेचं आहे. ही गरज लक्षात घेऊन NDMA ने घरातील सदस्यांना काही सूचना दिल्या आहेत. घरातील वृद्धांना घराच्या बाहेर पडू देऊ नका. कोरोना संसर्गाचा काळ असल्यामुळे घरातील वृद्धांसाठीच्या त्यांच्या नेहमीच्या औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात असेल याची काळजी घ्यावी. तसेच कोरोनाकाळ असल्यामुळे त्यांना कुठल्याही तणावात न ठेवता त्यांना त्यांची कामं करु द्यावीत.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करायला सांगा

कोरोनावर लस आली असली तरी कोरोना थोपवण्यासाठी प्रतिबंधक नियम पाळणे हाच सर्वांत प्रभावी उपाय असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम समजाऊन सांगा. वेळोवेळी हात धुणे, मास्क वापरण्याचे महत्त्व त्यांना नीट पटवून द्यावे.

घरातील ज्येष्ठ सदस्याच्या सतत संपर्कात राहा

कामाच्या व्यापामध्ये असल्यामुळे बहुतांश वेळा आपण घरातील प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो. मात्र, कोरोना संसर्गाचा काळ असल्यामुळे घरातील ज्येष्ठ सदस्याच्या सतत संपर्कात राहा. विशेष म्हणजे स्मार्ट फोन अपलब्ध असेल, तर व्हिडीओ कॉलवरुन त्यांना बोलत राहा. त्यांच्या फोनवर महत्त्वाचे नंबर स्पीड डायल मोडवर ठेवा. तसेच, सदस्यांना नकारात्मक बातम्यांपासून दूर ठेवा. विशेष म्हणजे तुमच्याकडे फ्री वेळ असेल तर घरातील ज्येष्ठ सदस्यासोबत वेळ घालवा. त्यांच्यासोबत वेगवेगळे खेळ खेळा.

पाहा एका मिनिटात सर्व टिप्स :

दरम्यान, देशात कोरोना रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या वरील सर्व गाईडलाईन्स पाळणे गरजेचे आहे. तसे आवाहन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.

इतर बातम्या :

Suez canal | सुएझ कालव्यातील जहाज काही निघेना; नेटकरी म्हणतात बाहुबलीला बोलवा, भन्नाट मीम्स व्हायरल

VIDEO | गायीची काळजी घेण्यासाठी महिला सरसावली; हात लावला अन् भलतंच घढलं, व्हिडीओ व्हायरल

Video | रेल्वेस्थानकामध्ये शिरला महाकाय हत्ती; पुढे जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही, पाहा व्हिडीओ

(NDMA National Disaster Management authority given safety tips to avoid corona infection to elder people)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.