AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases In India | देशात सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा चार लाखांखाली, मात्र कोरोनाबळींत वाढ

गेल्या 24 तासात भारतात 31 हजार 222 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 290 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 42 हजार 942 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा चार लाखांखाली, मात्र कोरोनाबळींत वाढ
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 10:01 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 7 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात 31 हजार 222 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 290 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 31 हजार 222 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 290 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 42 हजार 942 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 30 लाख 58 हजार 843 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 22 लाख 24 हजार 937 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 41 हजार 42 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 3 लाख 92 हजार 864 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 69 कोटी 90 लाख 62 हजार 776 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 31,222

देशात 24 तासात डिस्चार्ज – 42,942

देशात 24 तासात मृत्यू – 290

एकूण रूग्ण – 3,30,58,843

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,22,24,937

एकूण मृत्यू  – 4,41,042

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 3,92,864

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 69,90,62,776

गेल्या 24 तासातील लसीकरण – 

केरळात किती कोरोनाग्रस्त?

31 हजार 222 नवीन कोरोनाग्रस्तांपैकी एकट्या केरळमध्ये काल 19 हजार 688 रुग्ण सापडले, तर 290 कोरोना बळींपैकी केरळात 135 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये शिखर गाठेल?

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपाठोपाठ तिसऱ्या लाटेची भिती वाढू लागली आहे. देशात पुन्हा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान कहर करू शकेल. परंतु या लाटेची तीव्रता दुसऱ्या लाटेपेक्षा खूपच कमी असेल. साथीच्या गणिती मॉडेलिंगमध्ये सहभागी असलेल्या एका शास्त्रज्ञाने सोमवारी ही माहिती दिली. आयआयटी-कानपूरचे शास्त्रज्ञ मनींद्र अग्रवाल म्हणाले की, जर कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आले नाही तर परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. अग्रवाल हे तज्ज्ञांच्या तीन सदस्यीय पथकाचे सदस्य आहेत. या पथकाकडे कोरोनाच्या संसर्गवाढीचा अंदाज लावण्याचे काम देण्यात आले आहे

संबंधित बातम्या :

कोरोनाची तिसरी लाट ‘या’ महिन्यांत शिखर गाठेल; शास्त्रज्ञांनी वर्तवला अंदाज

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.