संकट दारापर्यंत येतंय, सावध राहा… ‘या’ शहरात नव्या व्हायरसचा कहर, शाळा-कॉलेज बंद, लॉकडाऊनसारखी स्थिती

कोरोनाच्या संकटातून जग आता कुठे सावरलं आहे. या संकटातून बाहेर पडल्यानंतर जगाने आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला आहे. तर सामान्य लोकांनीही आपली गमावलेली पूंजी वाढवण्यावर भर दिला आहे. हे संकट जात नाही तोच आता दुसऱ्या....

संकट दारापर्यंत येतंय, सावध राहा... 'या' शहरात नव्या व्हायरसचा कहर, शाळा-कॉलेज बंद, लॉकडाऊनसारखी स्थिती
Nipah VirusImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 4:18 PM

तिरुवनंतपूरम | 14 सप्टेंबर 2023 : कोरोनाच्या संकटातून संपूर्ण जग बाहेर पडलं आहे. या संकटातून अनेकांचे जीव वाचले आहेत. तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. अनेकांना तर आपल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषालाही गमवावे लागले आहे. कोरोनामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीत अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. अनेकांचे व्यवसाय बुडाले. या भयावह स्थितीतून लोक बाहेर पडत असतानाच आता आणखी एका नव्या संकटाला लोकांना सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. एका नव्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भल्या भल्यांची भंबेरी उडाली आहे.

केरळमध्ये निपाह व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी केरळच्या कोझिकोट येथील एका खासगी रुग्णालयात निपाह व्हायरसने दोन लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या व्हायरसचा प्रकोप वाढतच जात आहे. केरळ सरकारने केरळातील सात गावातील शाळा आणि बँका बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. केरळातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

राज्य सरकारचा अलर्ट

निपाह व्हायरसचा प्रकोप वाढल्याने राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे. केरळातील ज्या दोन लोकांचा निपाहमुळे मृत्यू झाला ते एकाच रुग्णालयात दाखल होते. त्यांचा एक नातेवाईकही अजून रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे या रुग्णालयातील अनेक रुग्णांचे सँपल घेऊन त्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात एकूण 700 संशयित रुग्ण असून त्यांच्यामुळे राज्याचं टेन्शन वाढलं आहे.

कर्नाटकात अलर्ट

दोन लोकांचा मृत्यू झाल्यानंतर कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरम या तीन जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सात ग्रामपंचायतीत कंटेन्मेंट झोन बनवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन निर्माण करण्यात आले आहे, तिथे मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातही निपाहमुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शाळा, बँका बंद

कोझिकोडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मीडियाशी संवाद साधला. सात पंचायत समित्यातील सर्व शाळा, शैक्षणिक संस्था, आंगणवाडी केंद्र, बँका आणि सरकारी संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फक्त औषधांची आणि अति महत्त्वाच्या वस्तुंची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यात सँपल पाठवले

केरळमध्ये 30 ऑगस्यट रोजी निपाहमुळे पहिला मृत्यू झाला. तर दुसरा मृत्यू 11 सप्टेंबर रोजी झाला. दोन्ही मृत व्यक्तींचे सँपल पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये पाठवले आहेत. निपाहचे आणखी दोन रुग्ण सापडले आहे. त्यात नऊ वर्षाच्या एका मुलाचा आणि एका 24 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. त्या दोघांवरही उपचार सुरू आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.