AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

No Smoking Day 2021 | शरीरासाठी विषासमान ‘धुम्रपान’, सिगारेटची सवय सोडायचीय तर ‘या’ टिप्स ट्राय करा!

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते धूम्रपान आणि तंबाखूमुळे दरवर्षी 7 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. 2019च्या आकडेवारीनुसार, भारतातील 35 टक्के लोक धूम्रपान करतात.

No Smoking Day 2021 | शरीरासाठी विषासमान ‘धुम्रपान’, सिगारेटची सवय सोडायचीय तर ‘या’ टिप्स ट्राय करा!
धुम्रपान
| Updated on: Mar 10, 2021 | 2:31 PM
Share

मुंबई : आज अर्थात 10 मार्च रोजी संपूर्ण देशात ‘No Smoking Day’ साजरा केला जात आहे. दरवर्षी मार्चच्या दुसर्‍या बुधवारी धूम्रपान दिन साजरा केला जात असतो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये धूम्रपान न करण्याबद्दल जागरूकता वाढवणे, त्याच्या गंभीर परिणामांची माहिती करून देणे, जेणेकरुन ते धूम्रपानाचे व्यसन सोडू शकतील. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते धूम्रपान आणि तंबाखूमुळे दरवर्षी 7 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. 2019च्या आकडेवारीनुसार, भारतातील 35 टक्के लोक धूम्रपान करतात. धूम्रपान केल्याने आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि आपण यातून मुक्त कसे होऊ शकता, ते जाणून घेऊया…(No Smoking Day 2021 some effective tips for quit smoking)

आपल्या सर्वांना हे माहित आहे की, सिगारेट धूम्रपान करणार्‍यांनाच त्रास देत नाही, तर त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनाही इजा करते. धूम्रपानामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, तसेच कर्करोगासह अनेक गंभीर आजारांना हे कारणीभूत ठरू शकते. या व्यतिरिक्त सिगारेट तुमच्या संपूर्ण शरीराला नुकसान करते. धूम्रपान केवळ आपल्या फुफ्फुसच नव्हे, तर त्वचेसाठीही हानिकारक आहे.

धूम्रपान केल्यामुळे आपले केस, त्वचा आणि नखे प्रभावित होतात. धूम्रपान केल्यामुळे, आपल्या नखांमध्ये बुरशीजन्य संसर्ग होतो आणि केस पांढरे होणे सुरू होते. या व्यतिरिक्त सिगारेटमध्ये उपस्थित असलेल्या निकोटीनचा स्त्री-पुरुषांच्या जननेंद्रियावर देखील परिणाम होतो. शरीरात निकोटिनचे जास्त प्रमाण लैंगिक संप्रेरकांवरही परिणाम करते (No Smoking Day 2021 some effective tips for quit smoking).

अशा प्रकारे सोडा धूम्रपान सवय!

धूम्रपान सोडणे थोडे अवघड काम आहे. परंतु, आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि काही योजना बनवून, ही सवय सोडू शकता. धूम्रपान सोडण्यासाठी आपण नाशमुक्ती केंद्राची मदत देखील घेऊ शकता. सुरुवातीच्या काळात काही पद्धतींचे अनुसरण करणे थोडे कठीण आहे, परंतु ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

ट्रिगर पॉईंटपासून दूर रहा!

बर्‍याच लोकांना चहा-कॉफी आणि मद्यपान करून सिगारेट ओढण्याची सवय असते. या कारणांना ट्रिगर म्हणतात. तेव्हा या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा. जर, तुम्ही एखाद्या पार्टीला जात असाल, जिथे तुमचे मित्र धूम्रपान करत असतील, तर तिथे जाऊ नका. काही काळ या मित्रांपासून दूर रहा. या गोष्टी तुम्हाला सिगारेट सोडण्यास मदत करतील

तलफ आल्यास लक्ष विचलित करा!

कशाचीही तलफ ही काही काळासाठी असतो. म्हणून अशा वेळी, आपण इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर, आपण त्या वेळी स्वत:वर नियंत्रण ठेवले, तर कालांतराने याची तुम्हाला सवय होईल. धूम्रपान नियंत्रित करणे आपल्यासाठी एखाद्या विजयापेक्षा कमी नाही.

निकोटीन थेरपीचा अवलंब करा.

बर्‍याच अभ्यासकांनी असे म्हटले आहे की, निकोटिन थेरपी सिगारेट सोडण्यासाठी प्रभावी आहे. सिगारेट सोडताना डोकेदुखी, खराब मूड आणि कमी उर्जा जाणवणे सामान्य आहे. निकोटीन गम आणि पॅचेस वापरुन तुम्ही धूम्रपान करण्याची सवय सोडू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(No Smoking Day 2021 some effective tips for quit smoking)

हेही वाचा :

Fatty Liver | मद्यपान न करणाऱ्यांनाही होऊ शकते ‘फॅटी लिव्हर’ची समस्या, जाणून घ्या याची कारणे-लक्षणे आणि उपाय…

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.